nmc esakal
नाशिक

NMC News : महापालिकेकडून थकबाकीदारांचे 10 गाळे जप्त

NMC : दीड हजार गाळेधारकांकडील ४४. ५८ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी विविध कर विभागाकडून जप्ती मोहीम सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : दीड हजार गाळेधारकांकडील ४४. ५८ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी विविध कर विभागाकडून जप्ती मोहीम सुरू झाली आहे. मोहिमेअंतर्गत शरणपूर मिनी मार्केटमधील पाच, यशवंत मंडईमधील चार, तर कठडा मार्केटमधील एक, असे एकूण दहा गाळे जप्त करण्यात आले. तर फुले मार्केटमधील १ ओटा जप्त करण्यात आला आहे. स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून २९४४ गाळे वितरित करण्यात आले. (nashik NMC Municipal corporation seal 10 shops of defaulters marathi news)

गाळ्यांची भाडेतत्त्वावरील मुदत संपल्यानंतर बाजारमूल्य तक्त्यानुसार भाडे दर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जानेवारी २०१७ पासून गाळे दरवाढ करण्याच्या मागणीसाठी गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. तेव्हापासून गाळेधारकांनी महापालिकेचे भाडे अदा केले नसल्याने थकबाकी वाढली.

एकूण ४४.५८ कोटी रुपये थकबाकी आहे. थकीत भाडे वसुलीसाठी दीड हजार गाळेधारकांना नोटिसा पाठविल्या. मुदतीत थकबाकी अदा न केल्याने जप्तीची कारवाई सुरु करण्यात आली. दोन दिवसात दहा गाळे सील करण्यात आले. त्यांच्याकडून ७.२२ कोटी रुपये थकबाकी वसुल करण्यात आली.

''गाळेधारकांनी थकबाकी अदा करावी. अन्यथा मोहीम अधिक तीव्र केली जाईल.''- मयूर पाटील, सहाय्यक आयुक्त, विविध कर विभाग. (Latest Marathi News)

अशी आहे थकबाकी (कोटी रुपयात)

विभाग थकबाकी रक्कम

पश्चिम २५.१८

नाशिकरोड ५.७८

पूर्व ५.७०

सातपूर ४.७०

पंचवटी १.९१

सिडको १.२९

एकूण ४४.५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

Eleventh Admission : अकरावी प्रवेशासाठी अंतिम संधी

CM Devendra Fadnavis : सरकार दबावाने नव्हे, संविधानानुसार चालते; जीसीसीमध्ये पुणे देशात अव्वल ठरणार

विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली, शिक्षकांनी रुग्णालयात नेण्याऐवजी आश्रमशाळेतच केला मंत्रोपचार, मेळघाटातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT