Nashik NMC esakal
नाशिक

Nashik NMC News : सरसकट करवाढ मागे घेण्याशिवाय दिलासा नाहीच! महापालिका अधिनियमात तरतूद नसल्याचे आयुक्तांचे स्पष्टीकरण

Latest Nashik News : करवाढ कमी केल्यास समायोजनाची रक्कम पुन्हा देय नसल्याची अधिनियमात तरतूद नाही. दुसरीकडे सरसकट करयोग्य मूल्यदरातील वाढ मागे घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC News : निवासी मालमत्तेच्या २५, तर अनिवासी मालमत्तेच्या ७५ टक्के करयोग्य मूल्यदर वाढीत कपात करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. असे असला तरीही त्यातून दिलासा मिळण्याची कुठलीच चिन्हे नाहीत.

करवाढ कमी केल्यास समायोजनाची रक्कम पुन्हा देय नसल्याची अधिनियमात तरतूद नाही. दुसरीकडे सरसकट करयोग्य मूल्यदरातील वाढ मागे घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहे. (no relief except to withdraw tax increase)

२०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करांमध्ये फेररचना करताना करांमध्ये चार ते पाचपटींनी वाढ केली. परिणामी नागरिकांमध्ये रोष वाढल्याने लोकप्रतिनिधींमध्ये भीती निर्माण झाली व महासभेत करवाढीचा प्रस्ताव फेटाळला. परंतु तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी करयोग्य मूल्यदरात वाढीचा फेटाळलेला ५२२ क्रमांकाचा ठराव शासनाकडे सादर न करता दप्तरी दाखल केला व आयुक्तांचे करवाढीचे अधिकार असल्याचा दावा करत २०१८ पासून महापालिका क्षेत्रात निवासी व अनिवासी क्षेत्रात करवाढ लागू केली.

आतापर्यंत ही करवाढ लागू आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील शिवसेनेच्या शिंदे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करयोग्य मूल्य दरातील वाढ मागे घेण्यासाठी वारंवार मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला पत्र लिहून फेरमुल्यांकन सादर करण्याचे सूचना दिल्या. (latest marathi news)

करवाढ महापालिका रद्द करू शकत नाही, मात्र मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याने करवाढीमध्ये निवासी क्षेत्रातील पंचवीस टक्के, तर अनिवासिक क्षेत्रातील ७५ टक्के करवाढ कपात करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. मात्र, महापालिका आयुक्तांनी महापालिका अधिनियमाचा दाखला देत एक तर संपूर्ण कारभार रद्द करावी लागेल, असा दावा केला.

मागील पाच वर्षातील ज्यांच्याकडून वाढीव दराने मालमत्ता कर घेतला. त्यांना समायोजनाची रक्कम देता येणार नाही, अशी महापालिका अधिनियमांमध्ये तरतूद आहे. त्यामुळे करयोग्य मूल्य दरातील वाढ संपूर्णपणे मागे घ्यावे लागेल असे स्पष्टीकरण दिले.

"पाच वर्षांपासून वाढीव दराने करवसुली केली जात आहे. त्यामुळे निवासी व अनिवासी क्षेत्रातील कर वाढ कपात केल्यास समायोजनाची रक्कम देण्याची तरतूद नाही. त्यामुळे शासनाला संपूर्ण करवाढ रद्द करावी लागेल."- डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Mayor : ठाकरेंची ऐनवेळी भाजपला साथ, काँग्रेसचा १ मतानं पराभव; पक्षाचा आदेश डावलणाऱ्यांवर वंचितकडून कारवाई

Patan Politics: पाटणच्या रणधुमाळीत ‘टांगा पलटी, घाेडे फरार’; पालकमंत्र्यांच्या विजयी रॅलीत मंत्री गोरे, गणेश नाईकांना कार्यकर्त्यांनी डिवचले!

Salman Khan Threat : रणवीर सिंग नंतर आता सलमान खानच्या निकटवर्तीय अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, कोट्यवधींची मागितली खंडणी

Khandala Crime: खंडाळा तालुक्यातील ‘त्या’ मृतदेहाचा खूनच; पुणे, साखरवाडीतून संशयित ताब्यात, तपासात धक्कादायक माहीती समाेर!

Satara Politics: सातारा जिल्ह्यात ‘सत्ता’खल! राष्‍ट्रवादी-शिवसेनेत खलबते; संजीवराजे ऑनफिल्‍ड, नेमकं काय ठरलं?

SCROLL FOR NEXT