नाशिक

नामनिर्देशित सदस्य नियुक्तीवरून वाद

CD
फोटो : H34572 -------------- नामनिर्देशित सदस्य नियुक्तीवरून वाद गटनेत्यांचा आयुक्तांना पत्राद्वारे इशारा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : महापालिकेतील नामनिर्देशित सदस्य नियुक्तीच्या प्रक्रियेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना- काँग्रेस शहर विकास आघाडीचे गटनेते केशव पोरजे यांनी आयुक्तांना पत्र पाठवून बेकायदेशीर शिफारस रद्द करण्याची मागणी केली आहे. गटनेत्यांमार्फत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर दुपारी तीनपर्यंत होती. शिवसेना-काँग्रेस आघाडीला विभागीय आयुक्तांनी ५ फेब्रुवारीला मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवसेना किंवा काँग्रेसचा स्वतंत्र गट आता महापालिकेत अस्तित्वात नाही. असे असतानाही सदस्य सुफियान जीन यांनी स्वतःला काँग्रेस गटाचे गटनेते भासवून तीन व्यक्तींची नावे नामनिर्देशित सदस्यपदासाठी सूचित केल्याचा आरोप पोरजे यांनी केला आहे. आघाडी स्थापन झाल्यानंतर तिच्या सदस्याला बाहेर पडता येत नाही. असे केल्यास तो सदस्य अपात्र ठरतो, अशी कायद्यात तरतूद आहे. जीन यांनी केलेली शिफारस विचारात घेऊ नये, ती आपल्याच स्तरावर रद्द करावी, अशी मागणी पोरजे यांनी केली आहे. अन्यथा संगनमताने निर्णय घेतल्याचा निष्कर्ष काढून मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच जीन यांना अपात्र ठरवण्यासाठी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

Kumbhephal Accident: कुंभेफळ उड्डाणपुलावर काळाचा घाला! भरधाव चारचाकीच्या धडकेत १३ वर्षीय एकुलत्या एक गौरवचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Ambegaon News: आंबेगावकरांना दिलासा! पाणी-चारा टंचाई निवारणासाठी जून २०२७ पर्यंतचा आराखडा तयार; ६५ टँकरची तयारी

Latest Marathi News Live Update : भाजपच्या पदयात्रेमुळे नागपूर ठप्प; दिवाळी खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांची कोंडी

SCROLL FOR NEXT