पान-३ साठी
---------------
CHE26B1803--- हा फोटो मुख्य
नाशिकरोड ः उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला येथे शनिवारी प्रारंभ झाला. शुभारंभांची कुस्ती लावताना प्रभाग सभापती रमेश धोगडे, पहिलवान राजाभाऊ लोणारी, गोरखनाथ बलकवडे, उत्तम दळवी, कोंडाजी ढोमसे आदी.
------------------
CHE26B18033-- CHE26B18034-- CHE26B18035
नाशिकरोड ः उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विविध क्षण (छायाचित्र ः अंबादास शिंदे)
----------------------
उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू
------------
पहिल्या लढतीत नगरच्या सोनाली मंडलिकची नाशिकच्या अपर्णा घुगेवर मात
-------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिकरोड, ता.३१ : येथील महापालिका शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर पंधराव्या उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ प्रभाग सभापती रमेश धोंगडे, पैलवान राजाभाऊ लोणारी आणि कुस्तीगीर परिषदेचे सचिव गोरखनाथ बलकवडे यांच्या हस्ते झाला. स्पर्धेतील पहिल्या लढतीत नगरच्या सोनाली मंडलिकने नाशिकच्या अपर्णा घुगेचा १०- ० गुणांनी पराभव केला.
------------
स्पर्धेत नाशिक, धुळे, अहिल्यानगर, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील महिला व पुरुष पैलवान सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी आलेल्या पैलवानांच्या निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष उत्तम दळवी, कोंडाजी ढोमसे, रवींद्र मोरे, नामदेव गायधनी, आयोजक ज्ञानेश्वर बोराडे, ईश्वर शिरसाठ, दिलीप गायधनी, संदेश भागवत, चेतक बलकवडे, मधुकर वाघ, विजय गांगुर्डे, ज्ञानेश्वर शिंदे, नामदेव गवळी, रमेश बोराडे, रघुनाथ गायकवाड आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी मधुकर वाघ, चेतक बलकवडे, विशाल बलकवडे, रतन सांगळे, ज्ञानेश्वर शिंदे, नामदेव गवळी, दशरथ गायकवाड आणि रमेश बोराडे यांच्यासह अनुभवी पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. किरण मते यांनी सूत्रसंचालन केले.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.