Notice of land acquisition esakal
नाशिक

Nashik News : हयात नसलेल्यांच्या नावे भूसंपादनाची नोटीस; रोहिले ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Nashik : त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील रोहिले गावात नवीन तलाव बांधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील रोहिले गावात नवीन तलाव बांधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. त्यातील आठ व्यक्ती हयात नसतानाही त्यांची खातरजमा न करताच त्यांच्या नावे प्रशासनाने नोटीस बजावल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. रोहिलेच्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ५) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेत तलावाच्या भूसंपादनास तीव्र विरोध केला. (Notice of land acquisition in favor of non living Rohile village complaint to District Collector )

औरंगाबाद येथील जलसंधारण महामंडळाने रोहिले येथील लघुपाटबंधारे तलावास प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा बंधारा बांधण्यासाठी एकूण १३५ एकरची आवश्‍यकता आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे, त्यातील बहुतांश शेतकरी भूमिहीन होणार आहेत. ज्यांनी बंधाऱ्याचे समर्थन केले, त्यांची फक्त १८ हेक्टर (४५ एकर) क्षेत्र या तलावात जाणार आहे. त्यांच्याकडे दुसऱ्या ठिकाणी जमिनी असल्यामुळे त्यांचा या बंधाऱ्यासाठी आग्रह असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. (latest marathi news)

रोहिले गावापासून अवघ्या सहा किलोमीटरवर किकवी हे धरण प्रस्तावित आहे. त्याला शासनाची मान्यताही असल्याने त्या धरणाचे पाणी गावात नैसर्गिक प्रवाहाने येऊ शकते. त्याऐवजी केवळ गावातील काही व्यक्तींच्या अट्टहासामुळे गावात पाझर तलाव मंजूर करण्यात आला. त्यासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना अक्षरश: धमकावले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भूसंपादनाबाबत वारंवार नोटीस प्रसिद्ध केली जाते.

मात्र, नोटीस पाठवताना संबंधित व्यक्ती हयात आहे की नाही, याची खातरजमा प्रशासनाकडून केली जात नाही. गावातील गोपाळ भोर, मंजुळाबाई खंबाईत, राधाबाई जाधव, संतू तिदमे, बबन तिदमे, ज्योत्स्ना कंठीकर, धर्मा खोडे व गणपत खोडे यांचा मृत्यू झालेला असतानाही त्यांच्या नावे नोटीस बजावण्यात आली आहे. अधिकारी गावात जमीन मोजण्यासाठी आले, तर आम्ही त्यांना मोजणी करू देणार नाही, असा इशारा येथील शेतकरी गणपत भोर, यमुनाबाई जाधव, पुंडलिक मोंढे, पुंडलिक भोर, दत्तू तिदमे, भारती पिंगळे, एकनाथ भोर, नारायण सहारे, अंबादास तांबे आदींनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : पदवीधरांचा कौल सरकारविरोधात; धोरणांबद्दल तरुणांची नाराजी, दुष्काळी मदतीची पाच हजारांची रक्कम अपुरी

मोठी बातमी! INDIA आघाडीच्या महारॅलीला अभिजीत दीपके यांचा पाठिंबा; ‘GYANU MUST GO’ म्हणत पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: ''महाराष्ट्रात आणखी २३ प्रकल्प येत आहेत.. भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड टेंडरशिवाय'', राज ठाकरेंची कर्जतमध्ये सभा

MLA Harshada Deshmukh : एमपीएससीतील पारदर्शकतेसाठी प्रयत्न करणार; रोजगार, शिक्षणाच्या प्रश्नांवरही देणार भर

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

SCROLL FOR NEXT