dengue esakal
नाशिक

Nashik NMC : आता महापालिकेमार्फतच होणार डेंगी रुग्णांचे निदान! सेंटिनेंटल लॅबच्या प्रस्तावाला राज्य शासनाचा हिरवा कंदील

Latest Nashik News : आता महापालिकेमार्फतच डेंगीच्या रुग्णांचे निदान होणार आहे. यामुळे प्रत्यक्षातील रुग्णांचा आकडा प्राप्त होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC : शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंगी रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंगी रुग्ण आहे की नाही, यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील सेंटिनेंटल लॅबवर अवलंबून राहावे लागते. या लॅबवर येणारा ताण लक्षात घेऊन महापालिकेने लॅब उभारणीच्या दिलेल्या प्रस्तावाला राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे आता महापालिकेमार्फतच डेंगीच्या रुग्णांचे निदान होणार आहे. यामुळे प्रत्यक्षातील रुग्णांचा आकडा प्राप्त होणार आहे. (Now dengue patients will be diagnosed through NMC)

मागील पाच वर्षांपासून नाशिक शहरांमध्ये डेंगी रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. २०२० मध्ये ११९१ संशयित रुग्ण आढळले होते. त्यातील ३३६ रुग्ण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. २०२१ मध्ये ५२८४ संशयित डेंगीचे रुग्ण आढळले. यातील ११८४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

२०२२ मध्ये २८७१ संशयित रुग्ण आढळले, त्यापैकी ६७७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. २०२३ मध्ये ६२६६ रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठविले, त्यातील १२९४ अहवाल पॉझिटिव्ह आले. २०२४ मध्ये ऑगस्टअखेर ४९६३ संशयित रुग्ण आढळून आले. त्यातील ८७९ जणांना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले.

संशयित डेंगी रुग्णांच्या रक्त नमुन्यांची चाचणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील सेंटिनेंटल लॅबकडे केली जाते. निदान असेल तरच रुग्णांची नोंद होते. मात्र, जिल्हा रुग्णालयातील लॅबकडे ग्रामीण भागातील अहवालदेखील येतात. त्यामुळे लॅबवर कामाचा ताण निर्माण होऊन अहवाल प्राप्त होण्यास विलंब होतो व परिणामी डेंगीचे निदानदेखील उशिराने होते.

ऑगस्ट महिन्यात लॅबमध्ये तपासणी किटचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे जवळपास साडेपाचशे अहवाल प्रलंबित राहिले. राज्य सरकारनेदेखील याची दखल घेत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे कान टोचले. तर दुसरीकडे जिल्हा रुग्णालयानेदेखील महापालिकेची आर्थिक क्षमता असल्याने स्वतंत्र लॅब तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (latest marathi news)

पुढील आठवड्यात भरती

महापालिकेने राज्य शासनाच्या वैद्यकीय विभागाकडे प्रस्ताव सादर केला. त्यामुळे लॅब उभारणीला तातडीने परवानगी देण्यात आली आहे. नाशिक रोड येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात ही लॅब तयार केली जाणार आहे.

याकरिता पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, तंत्रज्ञ आदी कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती केली जाणार आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. नोव्हेंबरपासून लॅब पूर्ण क्षमेतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

"राज्य शासनाने सेंटिनेंटल लॅब उभारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नाशिक रोड येथील रुग्णालयात लॅब उभारली जाणार आहे. पुढील आठवड्यात तज्ज्ञ कर्मचाऱ्यांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल."- डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT