voting esakal
नाशिक

Nashik News : नाईक संस्‍था मतदार यादीबाबत हरकती दाखलची संख्या 30 वर

Nashik : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीसंदर्भात बुधवारी (ता. ३) आणखी १९ हरकती दाखल झाल्‍या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीसंदर्भात बुधवारी (ता. ३) आणखी १९ हरकती दाखल झाल्‍या आहेत. त्‍यानुसार दोन दिवसांत प्राप्त हरकतींची संख्या ३० झाली असून, शुक्रवारी (ता. ५) दुपारी चारपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत असेल. यासंदर्भात निवडणूक मंडळाचे अध्यक्ष ॲड. जालिंदर ताडगे यांनी माहिती दिली आहे. ते म्‍हणाले, की दुसऱ्या दिवशी एकूण १९ हरकती प्राप्त झाल्‍या आहेत. (number of objections filed against Naik Sanstha voter list has reached 30)

यामध्ये प्रामुख्याने नावांमध्ये दुरुस्‍ती, विवाहित महिला सभासदांच्‍या नावामध्ये बदल, यादीत नाव नसणे आदी स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश आहे. संबंधितांकडून विहित अर्ज व आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. प्राप्त तक्रारींची छाननी केल्‍यानंतर निपटारा केला जाईल. संस्‍थेच्‍या सभासदांच्‍या प्रारूप मतदारयादीत आठ हजार ६९२ सभासद मतदारांच्‍या नावांचा समावेश आहे. यादीसंदर्भात हरकती नोंदविण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी (ता. २) पहिल्‍या दिवशी अकरा हरकती प्राप्त झाल्‍या होत्‍या. बुधवारी (ता. ३) दिवसभरात १९ हरकत अर्ज प्राप्त झाले. (latest marathi news)

प्रारूप यादीत तालुकानिहाय मतदारसंख्या अशी-

नाशिक - २,५३८

निफाड - २,०३०

सिन्नर - १,८४५

नांदगाव - ९०८

येवला - ५९९

दिंडोरी - ५८७

मालेगाव - १००

इगतपुरी - १२

बागलाण - २१

कळवण - ३

इतर शहरांतील सभासद मतदार-

मुंबई - ३०

संगमनेर - ३

चाळीसगाव - २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT