Ozar Municipal Council
Ozar Municipal Council esakal
नाशिक

Nashik News : ओझर नगरपरिषद कामकाजात जय-विरूची जोडी ठरतेय डोईजड! तत्कालीन अभियत्यांची विशेष चौकशी करण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

ओझर : येथे नगरपरिषद आस्थापनेत वर्षापूर्वी खुर्चीत असलेल्या काही अधिकाऱ्यांनी केलेले लोकाभिमुख कार्य नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांच्या माथी फुटत असल्याची बाब समोर आली आहे. आजही वरिष्ठ स्तरावरून रिमोट कंट्रोल याच जुना अधिकाऱ्यांच्या हाती असल्याचीही चर्चा आहे. यामुळे अर्थगणीक होणारा हस्तक्षेप कधी थांबणार, हा प्रमुख प्रश्‍न आहे. (Nashik officers becomes problem in Ozar Municipal Council work news)

विश्‍वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनंतर हा गंभीर प्रकार निदर्शनास आला. तत्कालीन माजी बांधकाम अभियंता वर्षभर ओझरच्या सेवेत असताना आपल्या खास पद्धतीने मर्जीतील काम उरकून घेतल्याची चर्चा आजही गावात असते. ते अभियंता ओझर येथेच वास्तव्यास असून, त्यांचे अंतर्गत लागेबांधे पावलोपावली हेळसांडपणाची साक्ष देतात. ओझर येथे मॉल संस्कृती रुजत असताना यांनी पूर्णपरवानगीबाबत मारलेला लक्षवेधी बाण त्यांच्या कार्यक्षमतेची साक्ष देतो.

आज संबंधित अभियंता तालुक्याच्या ठिकाणी सेवेत असताना ओझर प्रशासकीय आस्थापनेत त्यांचे असलेले वरदहस्त इतके खोल रुजलेले आहे की येथे पडलेल्या टाचणीचा आवाज त्यांच्या टेबलावर सेकंदात ऐकू जातो. असेच दुसरे अधिकारी एका विभागाचे अभियंता असताना मुख्याधिकाऱ्यांसह तिघांची असलेली अनुभवाची मैत्री जय-विरूला लाजवेल इतकी भक्कम आहे.

मुख्य बाब म्हणजे त्यावेळी सेवेत असलेल्या त्या अधिकाऱ्याला गाव विस्ताराचा अभ्यास असून, आताच्या मुख्याधिकाऱ्यांना येवल्याचा भार सांभाळून ओझरच्या सह्या करणे क्रमप्राप्त असताना जाता-येता मोठे निर्णय चाय पे चर्चा होऊन घेतले जात असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. आजमितीस दोन्ही अभियंते ओझरहून दुसऱ्या ठिकाणी बदलून गेले.

परंतु, नाशिकहून निफाडचा रस्ता सरळ असताना ओझर न येता एकाच गाडीत जाणारे हे महाशय म्हणजे ओझरचे आस्थापित रिमोट कंट्रोल तीस किलोमीटर वरून चालवतात. यामुळेच निर्णयक्षमता अन् अन्याय, निर्बंध, अधिकार प्रणाली सामान्य जनतेसाठी कधी खुली होणार, असा प्रश्‍न नागरिकांनी केला आहे.  (latest marathi news)

सकाळने केली शहानिशा

तत्कालीन बांधकाम अभियंत्याचा ओझर नगरपरिषदेवर असलेला खडा पहारा अन् त्या खड्याची असलेली खडान् खडा माहिती समोर आली तेव्हा सकाळने त्यांच्या काळात झालेल्या एका कामाबाबत विचारणा केली. यात सदर बिल्डिंग त्यांच्याच भावाने बांधल्याचे समोर आले.

त्यांच्याच भावाच्या नावे असलेला बिल्डरशिपचा व्यवसाय असून, त्या इमारतीबाबत रहिवाशांनी तक्रार केली होती. त्यांना याबाबत संपर्क केला असता त्यांनी थेट तुम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे जाऊन आले ना मग माझी कशाला प्रतिक्रिया हवी? त्यांची प्रतिक्रिया हीच माझी प्रतिक्रिया आहे,

असे समजा! आम्ही दोघे एकच आहोत, अशी उपरोधिक भाषा वापरल्याने सुत्रांनी दिलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले. या गंभीर बाबीची अन् त्या अभियंत्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणे गरजेचे आहे. म्हणजे आणखी प्रकरणे असल्यास ते जनतेसमोर येतील.

"मी ओझरला एकच गृहप्रकल्प केला. बांधकाम परवानगी, पूर्णत्वाचा दाखला अन् इतर काही बाबींमुळे नगरपरिषदेचे कामकाज लांबत चालले आहे. आम्ही अनेक वर्षांपासून नाशकात बिल्डरशिप करतो. पण, नोंदणी फी असो अथवा तेथे काम झाल्यावर तथ्य नसताना अनेक क्षुल्लक त्रुटी काढत प्रलंबितपणा कधीच नसतो. तो ओझर येथे जास्त आहे. ओझरच्या विकासात बांधकाम व्यावसायिक मोठी भर घालतात. पण, दिलेली कामे वेळेत व्हायला हवी, हीच माफक अपेक्षा आहे. नाशिकच्या मानाने ओझर हे पुढचे महानगर आहे. पण, होणारा मन:स्ताप प्रचंड आहे."- नरेश डंग, गुरुकृपा बिल्डर्स, नाशिक

"बांधकाम मंजुरी देताना ‘एकात्मिक शहर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’तील नियम व उपनियमांचा आधार घेतला जातो. यासाठी बांधकाम मंजुरी प्रकरणास विशिष्ट प्रक्रियेतून जाणे आवश्‍यक असते. नियमांची पूर्तता होत नसेल तर अशा प्रकरणांना पुनर्सादरीकरणास्तव नाकाराले जाते. अशा स्थितीत संबंधित पक्षकाराचा बांधकाम विभागात कार्यरत तज्ज्ञ अधिकाऱ्यांवर रोष संभवतो."- किरण देशमुख, मुख्याधिकारी, ओझर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT