नाशिक

सुरगाणा तालुक्यातील अकरा अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव.

CD
फोटो- 03160 नाशिक ः कालिदास कलामंदिर येथे उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते स्वीकारताना गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख. सुरगाणा तालुक्यातील अधिकाऱ्यांचा सत्कार सुरगाणा, ता. १९ ः ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद नाशिक आयोजित मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत तालुक्यातील तीन कर्मचारी व अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यात गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब खेडकर, गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ, माधव गावित, राशाचे सरपंच सीताराम भोये, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर वाघेरे, बुबळीचे सरपंच मनोहर राऊत, ग्रामविकास अधिकारी गणेश गावित, स्वच्छता अभियानाचे तालुका समन्वयक योगेश महाले, गृहनिर्माण अभियंता पल्लवी चौधरी यांचा समावेश आहे. गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांनी आदिवासी भागात मिशन नवोदय, सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून अहमदाबाद येथे विज्ञान प्रयोगशाळेस भेटी करीता विद्यार्थ्यांना विमान प्रवास घडवून आणला. भाभा संशोधन केंद्रास विद्यार्थी भेट, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान, शिष्यवृत्ती परीक्षा, इंग्रजी भाषेत स्पेलिंग बी स्पर्धा आदी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. सुरगाणासारख्या अतिदुर्गम तालुक्यात शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे, विकासकामांना गती देणे, नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविणे यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असतात. या सोहळ्याच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असून, इतरांनाही प्रेरणा मिळेल. पुरस्कार हा केवळ व्यक्तीचा सन्मान नसून त्यांनी केलेल्या प्रामाणिक कार्याचा, सामाजिक बांधिलकीचा आणि जनसेवेच्या भावनेचा गौरव असते, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी काढले. ...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दादर रेल्वे स्थानकाचं नाव तेच राहणार'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं जाहीर; पण, 'चैत्यभूमी' नावाच्या चर्चेवर म्हणाले...

PM Kisan Yojana Rules : जमीन वडिलांच्या नावावर अन् शेती चार मुलं करतात; मग, चारही भावांना 'पीएम किसान'चे 6,000 मिळणार की 24,000 रुपये? काय सांगतो सरकारी नियम?

'देऊळ बंद' फेम आर्या घारेने बदललं नाव; वडिलांचं नाव अन् आडनावही हटवलं, म्हणाली...

Gondia Murder Case : पतीच्या मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच दिली १३ लाखांची सुपारी! २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी उलगडला गोंदियातील वर्षा तुरकर हत्याकांडाचा थरार

Marathi News Live Updates : स्वीकृत सदस्य निवडीसाठी अर्ज करण्यास दोन दिवस बाकी

SCROLL FOR NEXT