Old Pension Scheme esakal
नाशिक

Old Pension Scheme : ‘बांधकाम’च्या 8 अधिकाऱ्यांना अखेर जुनी पेन्शन योजना लागू

Nashik News : सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता दर्जाच्या राज्यातील आठ अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

निखिल रोकडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जुनी पेन्शन योजना बंद होण्याची आधी असलेली नोकरभरतीची जाहिरात आणि त्यात जुनी पेन्शन योजना लागू होण्याची असलेली तरतूद यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता दर्जाच्या राज्यातील आठ अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (Old pension scheme finally applied to 8 construction officials)

शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर झालेल्या नोकरभरतीसाठी जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. मात्र ज्यांची शासकीय सेवेतील भरती प्रक्रिया ही पेन्शन योजना बंद करण्याच्या निर्णयाआधी सुरू झाली होती, अशा सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. इतरत्र विभागातीलही काही शासकीय सेवकांना या योजनेचा तांत्रिक मुद्यांवर लाभ मिळणार आहे.

नोकरभरतीची प्रक्रिया १ नोव्हेंबर २००५ आधीपासून सुरू होती. मात्र त्यांची निवड व नियुक्ती मात्र २००५ नंतर झाल्याने त्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली नव्हती. भरती प्रक्रियेची अधिसूचना ही पेन्शन बंद करण्याच्या अगोदर तसेच अधिसूचनेतही जुनी पेन्शन योजना लागू असेल, असा स्पष्ट उल्लेख होता.

त्यामुळे नंतर निवड झालेल्या शासकीय सेवेमध्ये आलेले अधिकारी/कर्मचारी यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शासनाने जुनी पेन्शन लागू करण्याचे आदेश दिली आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णयानुसार जुनी निवृत्ती योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांची राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीमधील खाते संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालय प्रमुखांनी तत्काळ बंद करावे. (latest marathi news)

वरील अधिकाऱ्यांचे भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडण्यात यावे. या खात्यात राष्ट्रीय निवृत्तिवेतन खात्यातील त्यांच्या हिश्श्याची देय रक्कम व्याजासह जमा करण्यात यावी. त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन खात्यातील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात यावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे.

नक्की काय आहे प्रकरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अधिसूचनेनुसार १५ सप्टेंबर २००४ ला महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा-२००४ मध्ये सरळ सेवा भरतीसाठी घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आली होती. ही परीक्षा ५ व ६ फेब्रुवारी २००५ ला घेण्यात आली. परीक्षेच्या निकालाच्या आधारे सार्वजनिक बांधकाम विभागात महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ मध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता गट-अ या पदावर संबंधितांना नियुक्ती देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT