Suspect Vilas Narwade who was detained by the police while distributing money. esakal
नाशिक

Nashik Teacher Constituency Election : नाशिक शहरात मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप करताना एकजण ताब्यात

Nashik News : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बी. डी. भालेकर मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप करताना भद्रकाली पोलिसांनी एकास ताब्यात घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बी. डी. भालेकर मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप करताना भद्रकाली पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. अन्य तीन महिला पळ काढण्यात यशस्वी झाल्या. भद्रकाली पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (ता. २६) मतदान झाले. बी. डी. भालेकर मतदान केंद्रात शांततेत व सुरळीत मतदान सुरू होते. (One detained by police while distributing money outside polling station)

दुपारी सव्वातीनच्या सुमारास एकजण सहकारी तीन महिलांसह केंद्राबाहेर जीपीओ टपाल कार्यालय भिंतीलगत मतदारांना पैसे वाटप करून आकर्षित करीत होते. बबन टिळे, योगेश गवारे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी मसूद जिलानी यांना माहिती दिली.

त्यांनी पैसे वाटप करताना संशयित विलास बाळू नरवडे (रा. शिंदे पळसे, ता. नाशिक) यास पकडले. तीन महिला पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. जिलानी यांनी पोलिसांना माहिती दिली. भद्रकाली गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितास ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात त्याची सखोल चौकशी केली.

त्याच्याकडे असलेल्या बॅगेत प्रत्येकी ५ हजार रुपये असलेले ४ खाकी कागदी पाकीट असे २० हजार रुपये, तसेच पांढऱ्या रंगाचे प्रत्येकी १ हजार रुपये असलेले ४९ हजार, तर एका पाकिटात ५०० असे सुमारे ६९ हजार ५०० रुपयांची रक्कम मिळून आली. पोलिसांनी रक्कम जप्त केली. दरम्यान, संशयित आणि त्यास पकडून देणाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. घटनेची माहिती कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. (latest marathi news)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे आणि पदाधिकारी केंद्रावर दाखल झाले. तसेच माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख विलास शिंदे, अन्य वरिष्ठ पदाधिकारी भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी संशयिताची सखोल चौकशी करून त्याच्यासह अन्य दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. पोलिस अंमलदार योगेश माळी यांच्या तक्रारीवरून संशयित नरवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

"निवडणुकीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने मिळून आलेल्या पैशांच्या पाकिटांवर कुणाचे नाव आणि फोटो आहे, याची चौकशी करावी. आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे." - वसंत गिते, माजी आमदार

"सत्ता मिळवून सत्तेचा वापर करत असे प्रकार करायचे. खरीच लोकशाही आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घडलेल्या प्रकाराबाबत कठोर कारवाई करावी. पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे." - विलास शिंदे, महानगरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission: जेवढा उशीर तेवढा फायदा! एकरकमी मिळणार 6,00,000 रुपये, किती असेल फिटमेंट फॅक्टर?

AUS vs IND: तीन स्पिनर्स, एक वेगवान गोलंदाज... पहिल्या T20I साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : 'लॉज'समोरच पत्नीने केली पतीची धुलाई

World Cup 2025: भारताचं टेन्शन वाढलं! सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियाची कर्णधार करणार पुनरागमन, झळकावली सलग दोन शतकं

BSNL Vacancy 2025 : फ्रेशर्सना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 50 हजारांपर्यंत बेसिक सॅलरी

SCROLL FOR NEXT