Nashik Onion Auction  esakal
नाशिक

Nashik Onion Auction : अवघ्या 5 बाजार समित्यांमध्येच लिलाव; चौकशी समित्यांचा बडगा उगारूनही व्यापारी भूमिकेवर ठाम

Onion Auction : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील अडतदार व व्यापाऱ्यांनी हमाल, मापाऱ्यांची कपात व ‘लेव्ही’ला विरोध करीत लिलाव बंद करून पंधरा दिवस झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Auction : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील अडतदार व व्यापाऱ्यांनी हमाल, मापाऱ्यांची कपात व ‘लेव्ही’ला विरोध करीत लिलाव बंद करून पंधरा दिवस झाले आहेत. आतापर्यंत फक्त पाच बाजार समित्यांमधील लिलाव पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश आले. उर्वरित दहा ठिकाणांचे लिलाव सुरू करण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर लिलाव सुरू करण्यास प्रशासनाचा विरोध आहे. (Nashik Onion Auction in only 5 market committees marathi news)

विनापरवानगी व्यापारी संघटना पुरस्कृत १२ ठिकाणी असे कृषिमालाचे लिलाव सुरू आहेत. हे लिलाव बेकायदेशीर असल्याने त्याची सहकार विभागामार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर पाच बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी माघार घेत बाजार समित्यांमधील लिलावात प्रत्यक्ष सहभाग घेण्यास सुरवात केली. पण, उर्वरित बाजार समित्यांमधील व्यापारी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

बाजार समितीत कृषिमालाच्या खरेदी-विक्रीवेळी आकारल्या जाणाऱ्या हमाली, तोलाई, वाराई वसुलीचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. थकीत लेव्हीच्या वसुलीसाठी माथाडी कामगार मंडळाने एक हजार ४०० व्यापाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. या विरोधात व्यापारी संघटनेने न्यायालयात अपील करीत स्थगिती मिळवली. नंतर व्यापाऱ्यांनी हमाली, तोलाई कपात करायची नाही, त्यामुळे लेव्हीचा प्रश्न उद्‍भवणार नसल्याचे निश्चित केले. (latest marathi news)

यामुळे माथाडी-मापारी दैनंदिन कामकाजातून बाजूला झाले. जिल्ह्यातील जवळपास १५ बाजार समित्यांनी ४ एप्रिलपासून लिलाव बंद ठेवले होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रचलित पद्धतीने हमाली, तोलाई व वाराई कपात करावी आणि लिलाव सुरू करण्याची सूचना केली. तथापि, अनेक व्यापाऱ्यांनी त्यास अद्याप दाद दिलेली नाही.

खासगी जागेवर १२ ठिकाणी व्यापारी संघटनांनी बेकायदेशीरपणे कृषिमालाचे लिलाव सुरू केल्याचे समोर आले. याबाबत माथाडी संघटनेने तक्रार केल्यावर सहकार विभागाने या खरेदी केंद्राच्या तपासणीसाठी १२ पथकांची नियुक्ती केली होती. ही चौकशी सुरू झाल्यावर खासगी जागेवर सुरू असणारे काही लिलाव बंद झाल्याचे सांगितले जाते; परंतु पथकांचा अहवाल अद्याप आलेला नसल्याने याची स्पष्टता झालेली नाही.

गुरुवारी (ता. १८) जिल्ह्यातील १५ पैकी पाच बाजार समित्यांचे कामकाज सुरू असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. म्हणजे १० बाजार समित्यांचे लिलाव अद्याप ठप्प आहेत. गुरुवारी लासलगाव, नाशिक, दिंडोरी, नामपूर व घोटी या पाच बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू होते. पिंपळगाव, येवला, मालेगाव, मनमाड, नांदगाव, सटाणा, कळवण, सिन्नर व देवळा या बाजार समित्यांमधील लिलाव बंद आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT