Onion Auction esakal
नाशिक

Nashik Onion Auction : जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव सुरू होणार

Onion Auction : लेव्हीच्या प्रश्‍नावरून तब्बल २५ दिवस जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Auction : लेव्हीच्या प्रश्‍नावरून तब्बल २५ दिवस जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याप्रश्नी ‘सकाळ’ने रविवार (ता. २१)च्या अंकात संपादकांच्या लेखणीतून या सदरात ‘लेव्हीचा प्रश्न कांदा उत्पादकांच्या मुळावर’ या शीर्षकाखाली बाजार समित्या, जिल्हा प्रशासन आणि व्यापाऱ्यांना यातून मार्ग काढण्याचे आवाहन केले होते. (Nashik Onion auction will start in district from today marathi news)

त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपळगाव बसवंत, मालेगाव, येवला, सिन्नरसह नायगाव बाजार समितीत सोमवार (ता. २२)पासून कांदा लिलाव सुरू करण्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे याबाबत शासन निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या रकमेतून कुठलीही कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.  (latest marathi news)

लेव्हीच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये व्यापारी व हमाल-मापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद केले होते. त्यांत्या बाजार समित्यांच्या संचालक मंडळाने मध्यस्थी करूनही दोन्हींकडील घटक आपापल्या मागणीवर ठाम राहिल्याने तोडगा निघू शकला नाही. अनेक ठिकाणी तर खासगी बाजार समित्या सुरू करून कांदा लिलाव सुरू करण्यात आले.

लासलगावसह विंचूर व निफाड उपबाजार आवारात गेल्या आठवड्यातच कांदा लिलाव सुरू करण्यात आले होते. मात्र, इतर प्रमुख बाजार समित्यांमधील तिढा कायम होता. रविवारी पिंपळगाव बसवंत, मालेगाव, येवला, सिन्नरसह नायगाव बाजार समित्यांमध्ये सोमवारपासून लिलाव सुरू करण्याचा निर्णय त्या-त्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : ४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT