खामखेडा परिसरात कांदा साठवणूक करताना शेतकरी वर्ग. esakal
नाशिक

Nashik Onion News : उन्हाळ कांदा साठवणुकीवर खामखेड्यातील शेतकऱ्यांचा भर! अल्प बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा निर्णय

Nashik News : कसमादे भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा काढणी सुरू केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा : सध्या कसमादे भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा काढणी सुरू केले आहे. मार्च एडिंग व सध्या कांद्याला असलेला अल्प भाव यामुळे कांदा उत्पादकांकडून साठवणुकीवर भर दिला जात आहे. (Nashik Onion Farmers Khamkheda summer onion storage marathi news)

दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी कांद्याची कमी लागवड झाली होती. कांद्याला पोषक वातावरण असल्यामुळे चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा असताना कांदा तयार होण्याच्या ऐन शेवटच्या टप्प्यात विहिरींच्या पाणीपातळीत प्रचंड प्रमाणात घट झाल्याने कांद्याला मोठा फटका बसला असून, ३० ते ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटणार आहे.

त्यातच सध्या कांद्याला मिळणाऱ्या अल्प बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या कांदा साठवणूक करीत आहे. यावर्षी कमी पावसामुळे कांद्याचे उत्पादन कमी होईल, असा कयास होता. सुरुवातीपासून चांगले वातावरण असल्यामुळे कमी पावसात देखील कांद्याचे पीक बहारदार होते.

मात्र, फेब्रुवारीच्या शेवटास गळीताच्या वेळी कांदा उत्पादक पट्ट्यातील विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट झाल्यामुळे कांद्याला मोठा फटका बसला आहे. तसेच, मार्च एण्डींगला कांद्याला मिळणाऱ्या सरासरी हजार ते बाराशे रुपये बाजारभावामुळे व केंद्र शासनाच्या १ एप्रिलनंतर देखील निर्यात खुली होणार नसल्याच्या सूचनेमुळे शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीकडे वळला आहे.

भविष्यात कांदाटंचाई जाणवणार

गिरणा नदीकाठच्या परिसरातील खामखेडा, भऊर, बगडू, पिळकोस, बेज, भादवण, विसापूर या परिसरामध्ये उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. फेब्रुवारी महिन्यातच गिरणा नदीचे दोन्ही आवर्तने एकाच वेळी सुटल्याने महिनाभरापासून गिरणानदी कोरडी आहे.

त्यामुळे कांदा पिकाला शेवटच्या टप्प्यात पाणी उपलब्ध न झाल्यामुळे उत्पादनात सर्वत्र घट झाली. दरवर्षी सर्वसाधारण शेतकरी २०० ते ३०० क्विंटल कांद्याची साठवणूक करत होता. मात्र, यावर्षी उत्पादनातील घट, अल्प बाजारभाव व दुष्काळामुळे भविष्यात कांदा टंचाई जाणवणार आहे.

"सध्या अल्प बाजारभाव व घटलेल्या उत्पादनामुळे अनेक शेतकरी कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवर भर देत आहेत. वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे दोन पैसे मिळतील, अशी आशा असल्याने शेतकरी कांद्याची साठवणूक करत आहेत."

- कारभारी मोरे, कांदा उत्पादक, खामखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे-मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! १० दिवसांनंतर 'डेक्कन क्वीन' पुन्हा रुळावर; 'इंटरसिटी'ही आजपासून सुरू

Nagpur News: एसटी प्रवाशांना दिलासा नाही! साध्या बसच्या 10% भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, 1 ऑगस्टपासून पूर्वीचे दर

Latest Marathi News Live Update : 'पुणे ग्रँड टूर'साठी 130 किलोमीटर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होणार; 137 कोटींच्या खर्चाला मान्यता

Kolhapur Dowry death case : जन्मताच संघर्ष! आईने जीवन संपवलं बापावर हुंडाबळीचा गुन्हा; अस्मिताच्या मुलीचे संगोपण चुलत सासू करणार, पोलिसांचेही डोळे पाणावले

Leopard Sighting Jyotiba Dongar : बाप रे! जोतिबा डोंगरावरील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात फिरताना दिसला बिबट्या; पाहा अंगावर काटा आणणारा CCTV

SCROLL FOR NEXT