Mathadi workers protesting in front of the administrative office of the Agricultural Produce Market Committee here.
Mathadi workers protesting in front of the administrative office of the Agricultural Produce Market Committee here. esakal
नाशिक

Nashik Onion News : माथाडी कामगारांचे आंदोलन सुरूच! सटाणा बाजार समितीत दुपारनंतर लिलाव नाही

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion News : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वारातच आज (ता.२५) तिसऱ्या दिवशीही माथाडी कामगारांचे सनदशीर मार्गाने व शांततेने आंदोलन चालूच होते. सकाळ सत्रात उन्हाळी कांदा लिलाव पुकारा झाला. दुपारी चारला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची बैठक असल्याने लिलाव बंद होता. उद्या शुक्रवार (ता. २६) मोठी लग्नतिथी असल्याने लिलाव बंद असतील. शनिवार व रविवार सलग सुट्टी आल्याने आता सोमवारीच (ता.३०) पुन्हा लिलाव सुरू होतील अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. ( Mathadi workers agitation continues in satana )

दरम्यान आज एकूण २१६ वाहनांमधून अंदाजे चार हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. भाव कमीत कमी तीनशे अन जास्तीत जास्त १५०३ रुपये मिळाला. आपल्यावर अन्याय करत शेतमालाचे लिलाव पूर्ववत सुरू केल्याच्या निषेधार्थ येथील बाजार समितीतील सर्व माथाडी कामगारांचे बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात लेव्हीच्या प्रश्नावरून गेल्या २५ दिवसापासून बाजार समितीचे कामकाज बंद होते. २००८ मध्ये लेव्ही प्रश्नावर औरंगाबाद खंडपीठाने लेव्ही व्यापारी किंवा खरेदीदारांनी द्यावी असा निकाल दिला. त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील व्यापारी असोसिएशनने या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. गेल्या पंधरा वर्षापासून निकाल लागलेला नसून ही बाब न्यायप्रविष्ट आहे.

शेतकऱ्यांच्या शेतमाल हिशोबपट्टीतून हमाली तोलाई वाराईची रक्कम कपात करणार नाही असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. माथाडी कामगारांनी न्यायप्रविष्ट असलेली लेव्ही मागूच नये असे व्यापारी असोसिएशनचे म्हणणे असल्याचा आरोप माथाडी कामगारांनी केला आहे. या विषयावर उच्चस्तरावर पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक, कामगार आयुक्त, व्यापारी असोसिएशन यांच्या वेळोवेळी बैठका झाल्या आहेत. (latest marathi news)

आचारसंहितेचा कालावधी असल्याने पुढील आदेशापर्यंत बाजार समिती सर्व घटकांना विचारात घेऊन प्रचलित पद्धतीने चालू कराव्यात असा लेखी आदेश बाजार समितीस देण्यात आलेला आहे. परंतु व्यापारी वर्गाने हमाली तोलाई, वाराई कपात न करण्याचा निर्णय घेऊन कामगारांना वेठीस धरले आहे, असेही माथाडींनी सांगितले.

माथाडी कामगारांची उपासमार

गेल्या २५ दिवसापासून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच सोमवारपासून कुठलाही लेखी आदेश नसताना बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळाने हमाली तोलाई वराई कपात न करता लिलाव चालू करण्याचे आदेश दिले आहेत. बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळांनी कामगारांना विश्वासात न घेता तसेच काम न देता एकतर्फी निर्णय घेत लिलाव सुरू केले आहेत. यामुळे माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

या कामगार विरोधी निर्णयाचा निषेध म्हणून कामगारांकडून ठिय्या आंदोलन केले जात आहे. बाजार समिती प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून कामगारांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषमुळे आचारसंहितेचा भंग झाल्यास त्यास बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळ जबाबदार राहील असेही या माथाडी कामगारांचे म्हणणे आहे.

गुरूवारचे सकाळ सत्रातील लिलाव

( भाव आणि वाहने)

१३०० ते १५३०=१५

१००० ते १३०० =८६

९०० ते ११०० =२८

७०० ते ९०० =३२

५०० ते ७०० =३६

३०० ते ५०० = १९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Updates : 'त्या' अल्पवयीन आरोपीचा अपघातापूर्वीचा पबमधला व्हिडीओ आला समोर; पब चालकासह इतरांवर गुन्हे दाखल

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Pune Accident News: पुण्यातील हिट अँण्ड रनप्रकरणी पोलिसाचं निलंबन? गृहमंत्र्याचे कठोर कारवाईचे आदेश; हे आहे कारण

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT