Arrival of onions in market committee on Wednesday. esakal
नाशिक

Nashik Onion Rate Fall : केंद्राच्या स्पष्टीकरणानंतर कांद्याच्या भावात घसरण; शेतकरी संघटना आक्रमक

Onion Rate Fall : लासलगाव बाजार समितीत ४०० ते ५०० रुपयांनी घसरण झाल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकवटल्या असून, तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Rate Fall : केंद्र सरकारने नोटिफिकेशन जाहीर न करताच केवळ निर्यातबंदी उठवली, या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कांद्याच्या (Onion) दरात बुधवारी (ता. २१) लासलगाव बाजार समितीत ४०० ते ५०० रुपयांनी घसरण झाल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकवटल्या असून, तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Nashik Onion price fall after export marathi news)

लासलगाव बाजार समितीच्या मुख्य सभागृहात बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा लासलगाव बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. तातडीने कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी, अन्यथा लवकरच मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

केंद्राच्या उत्पादकास मारक धोरणाचा निषेध करण्यात आला. राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, छावा क्रांती शेतकरी संघटना, शिवसेनेचे (ठाकरे गट) सदस्य उपस्थित होते.

जयदत्त होळकर, डॉ. सुजित गुंजाळ, ललित दरेकर, केदार नवले, अभिजित डुकरे, विकास रायते, गोरख संत, वाल्मीक सांगळे, शिवा सुरासे, विकास दरेकर, गोपीनाथ ठुबे, प्रवीण कदम, निवृत्ती गारे, राहुल वाघ, प्रमोद पाटील यांनी सहभाग घेतला.

''कांदा-द्राक्षासह इतर शेतीमालासंदर्भात केंद्राचे धोरण निराशाजनक आहे. हे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. वारंवार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ खेळला जात आहे. केवळ राजकीय स्वार्थापोटी या गोष्टी घडत आहेत.''- जयदत्त होळकर, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

पिंपळगावला २०० रुपये प्रतिक्विंटलने भाव कोसळले

पिंपळगाव बाजार समितीत लाल कांद्याचे दर सरासरी २०० रुपये प्रतिक्विंटलने कोसळले. दर कोसळताच शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. कांदानिर्यात खुली झाल्याच्या वृत्तानंतर पिंपळगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र निर्यातीचा खोडा कायम असल्याचे समजताच हा आनंद फार काळ टिकला नाही.

शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा केंद्र शासनावर टकेची झोड उठविली. मंगळवार (ता. २०) च्या तुलनेत पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचे दर सरासरी दोनशे रुपये प्रतिक्विंटलने घसरले. चारशे जीप, ट्रॅक्टरमधून दहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

किमान ४०० कमाल १८७०, सरासरी ८५० रुपये प्रतिक्विंटल दर कांद्याला मिळाला. मंगळवारच्या तुलनेत आजचे दर पाहता शेतकऱ्यांचे सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले. दर कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT