Nashik News sakal
नाशिक

Nashik News: येवल्यात कांदयाला अग्नीडाग देत केली होळी साजरी!

कांदा भावात सततच्या घसरणीमुळे शेतकऱ्याचे टोकाचं पाऊल

सकाळ वृत्तसेवा

Yeola News : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून हे पीक घेण्यासाठी गुंतवलेले भांडवलही मिळेनासे झाले आहे. यामुळे वैतागलेल्या मातुलठाण येथील शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी केली आहे.

गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दराचा गोंधळ वाढला असून यावर्षीच्या हंगामात तर मातीमोल दराने कांदा विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

घसरलेल्या दरामुळे नाशिक जिल्ह्यात ठीकठिकाणी आंदोलने होत असून शेतकऱ्यांचा उद्रेक सुरू आहे. रविवारी तर केंद्रीय मंत्री भारती पवार यांना शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नी घेराव घालत जाब विचारला होता.

गेल्या दोन महिन्या पासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.कांदा भाव घसरणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होळीचे औचित्य साधून मातुलठाण येथील तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन आगळेवेगळे आंदोलन केले.

कांद्याच्या भावात घसरण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली मात्र तरी देखील भावात सुधारणा झाली नाही.त्यामुळे डोंगरे यांनी टोकाचे पाऊल उचलत शेतात ठिकठिकाणी सरण रचून कांदा पेटवून देत संताप व्यक्त केला.

शासनाने आता तरी दखल घेऊन कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा तसेच यावर्षीच्या हंगामात विक्री केलेल्या कांद्याला हजार रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे अशी मागणी डोंगरे यांनी केली आहे.

- संतोष विंचू,येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT