RET Exam
RET Exam  esakal
नाशिक

RET Admission : धोरण बदलल्याने आरटीईत मागेल त्याला प्रवेश! आजपासून ऑनलाइन अर्ज भरणे सुरू

संतोष विंचू

RET Admission : आरटीईअंतर्गत आतापर्यंत फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाच प्रवेश दिले जात होते. या वर्षापासून जिल्हा परिषद, महापालिकेसह खासगी व्यवस्थापनाच्या शाळांचाही यात समावेश करण्यात आला. यामुळे विक्रमी जागा वाढल्याने मागेल त्याला प्रवेश मिळण्याचे चित्र दिसणार आहे. जिल्ह्यात यापूर्वी पाच हजारांच्या आसपास जागा होत्या, तोच आकडा यंदा ५३ हजार ४०० वर पोहोचला आहे. (nashik Online application of ret starts from today marathi news)

दरम्यान, प्रवेशासाठी पोर्टलवर विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया मंगळवार (ता. १६)पासून सुरू झाली असून, ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) गेल्या काही महिन्यांपासून प्रवेशप्रक्रिया रखडली होती.

अखेर या प्रवेशप्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून, आरटीईअंतर्गत विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया मंगळवार (ता. १६)पासून सुरू झाली आहे. शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशप्रक्रियेत यंदापासून अनेक बदल केले आहेत. इतकी वर्षे फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळातच आरटीईअंतर्गत प्रवेश दिले जात होते. यंदा नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांचाही प्रवेशासाठी समावेश केल्याने जिल्ह्यातील जागा पाच हजारांहून ५३ हजारांवर पोहोचल्या आहेत.

तसेच, विद्यार्थ्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरादरम्यान अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल तर एक किलोमीटरच्या अंतरावरील खासगी शाळेत त्यांना प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठीचा असा प्राधान्यक्रम आहे. मात्र, एखाद्या पालकाला स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासकीय शाळा निवडायची असेल तर मुभा असेल. अपवादात्मक स्थितीत निवासस्थानापासून एक किलोमीटर शाळा नसेल तर तीन किलोमीटरपर्यंतच्या शाळेत प्रवेश मिळणार आहे. (latest marathi news)

यंदा जागांमध्ये प्रचंड वाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) करण्यात आलेल्या बदलामुळे आता आरटीई प्रवेशप्रक्रियेत जागाही वाढल्या आहेत. यावर्षी राज्यातील ७५ हजार ९७४ शाळांमधील नऊ लाख ७२ हजार ८२३ जागांवर मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने मुलांना अर्ज करावा लागेल.

गेली अनेक वर्षे नाशिकमधील ४०१ शाळांत प्रवेशासाठी चार हजार ८५४ जागा उपलब्ध होत्या. नव्या बदल्यामुळे यावर्षी चार हजार १४ शाळांमध्ये तब्बल ५३ हजार ४०४ जागा उपलब्ध आहेत. प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतचा कालावधी मिळेल.

अशी आहे प्रवेशप्रक्रिया

प्रवेशाला पात्र ठरण्यासाठी पालकाचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला, तसेच बालकाचे सहा वर्षे वय झालेले असणे गरजेचे आहे. पहिलीला दिलेले प्रवेश पुढे त्याच शाळेत किंवा परिसरात आठवीपर्यंत नियमित राहतील. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

यासाठी लागणारी नियमावली, कागदपत्रे आदींबाबबत माहिती ही आरटीई पोर्टलच्या संकेतस्थळावर देण्यात आली. https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर पालकांनी जाऊन अधिक माहिती तपासावी.

* प्रवेशासाठी निकष

√ पाल्याचा जन्मतारखेचा पुरावा

√ जातीचा, उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला)

√ पालकाचा रहिवासी पुरावा

√ दिव्यांगत्वाचा पुरावा

√ बाळाचे व पालकाचे आधारकार्ड

● २०२३-२४ मधील उपलब्ध जागा

भाग- पात्र शाळा- प्रवेश क्षमता

महाराष्ट्र- ८८२०- १ लाख १ हजार ८८१

नाशिक- ४०१- ४ हजार ८५४

● २०२४-२५ मधील उपलब्ध जागा

भाग- पात्र शाळा- प्रवेश क्षमता

महाराष्ट्र- ७५,९८२- ८ लाख ८५ हजार ३११

नाशिक- ४,०१४- ५३ हजार ४०४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT