Home Guard Recruitment esakal
नाशिक

Nashik Home Guard Recruitment : होमगार्ड भरतीसाठी उद्यापासून ऑनलाईन नोंदणी!

Home Guard Recruitment : नाशिक जिल्ह्यातील रिक्त १३० होमगार्ड जागांसाठी उद्यापासून (२६) ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. उमेदवारांना १४ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यातील होमगार्ड भरतीला प्रारंभ झाला आहे. त्यानुसार, नाशिक जिल्ह्यातील रिक्त १३० होमगार्ड जागांसाठी उद्यापासून (२६) ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. उमेदवारांना १४ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. (Online Registration for Home Guard Recruitment from Tomorrow)

राज्यातील सुमारे ९ हजार ७०० रिक्त होमगार्डस्‌ जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नुसार नाशिक जिल्ह्यातील रिक्त असलेल्या १३० होमगार्डससाठी भरतीची प्रक्रिया होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील उमेदवारांनी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी केले आहे.

इगतपुरी, सिन्नर, निफाड, नाशिक शहर या तालुक्यातील पथक व पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या आणि होमगार्डमध्ये सेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीच नोंदणी करावी. या अनुशेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक (होमगार्ड), नाशिक यांना आहे. (latest marathi news)

तालुकानिहाय पथकातील अनुशेष

इगतपुरी :- पुरूष २५, महिला ५ एकूण - ३०,

सिन्नर :- पुरूष २५, महिला ५ एकूण - ३०,

निफाड :- पुरूष १५, महिला ०० एकूण - १५

नाशिक शहर :- पुरूष ४४, महिला ११ एकूण - ५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal to Amit Shah : ‘’...अशा मंत्र्याने, पंतप्रधानांनीही त्यांचे पद सोडावे का?'’ ; केजरीवालांचा अमित शहांवर निशाणा!

Ajit Pawar: गणेशोत्सवाआधी आनंदाची बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांना पगार कधी मिळणार? अजित पवारांनी तारीखच सांगितली

What a Comeback: मिराबाई चानू वर्षभरानंतर स्पर्धेत उतरली अन् पटकावलं ऐतिहासिक 'गोल्ड'; सोबत चार खेळाडूंनीही जिंकले सुवर्ण

Manoj Jarange Patil : फडणवीस साहेब मराठ्यांच्या पोराला काठीने डिवचले तर सरकार उखडून टाकेल

Pune Crime : विनापरवाना फ्रेशर्स पार्टीचे आयोजन; ‘किकी’ पबवर गुन्हा

SCROLL FOR NEXT