nashik onoin  action news meeting between onion traders and Dada Bhuse did not lead to a solution
nashik onoin action news meeting between onion traders and Dada Bhuse did not lead to a solution  
नाशिक

Nashik Onion News : नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला! दादा भुसेंच्या व्यापाऱ्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाहीच

विनोद बेदरकर

नाशिक - जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या बहिष्काराच्या अनुषंगाने आज पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. कांदा व्यापाऱ्यांच्या अनेक मागण्या या केंद्र शासन स्तरावरील तसेच धोरणात्मक आहेत. तसेच कृषी आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कडे मंगळवारी (ता.२६) बैठक असल्याने चर्चेतूनच यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचे भुसे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कांदा व्यापारी असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत कांदा व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडतांना आधी निर्यात शुल्कामुळे फटका बसला, आता नाफेडच्या विक्रीमुळे कांदा बाजारात व्यवसाय करणे अवघड झाल्याने नाफेडच्या विक्रीवर निर्बधांसह विविध अडचणी मांडल्या. तसेच कांदा व्यापाऱ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मात्र त्यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याचे सागितले.

बैठकीत भुसे यांनी कांदा व्यवसायीकांच्या मागणीनुसार, पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे २६ सप्टेंबरला बैठक बोलावली आहे. त्यामुळे बहिष्कार मागे घ्यावा तसे आजच्या बैठकीत जाहीर करण्याची मागणी केली. त्यावर व्यवसायीकांनी कांदा व्यवसायीकांची बैठक होणार असून त्यात निर्णय घेतल्यावर उद्या तो जाहीर करणार असल्याचे सांगितले.

बैठकीनंतर भुसे म्हणाले की, कांदा व्यापाऱ्यांच्या अनेक मागण्या केंद्र तसेच राज्य सरकारशी निगडित आहेत, तसेच येत्या मंगळवारी (ता.२६) कृषीमंत्र्याकडे बैठक होणार आहे मात्र असे असले तरी, हा विषय चर्चेतूनच सुटणार असल्याने व्यापाऱ्यांशी पुन्हाजपुन्हा चर्चा करुन तोडगा काढणे हाच मार्ग असल्याचे सांगितले.

अशा स्थितीत कांदा व्यापाऱ्यांना आम्ही विनंती केली की, लिलाव सुरू करावे २६ सप्टेंबरच्या बैठकीत आपले मुद्दे मांडावे. तोपर्यत कांद्याचे लिलाव तोपर्यंत सुरू ठेवावे येणाऱ्या काळात सण असतांना कांदा उत्पादक शेतकरी यांचे नुकसान होणार नाही यासाठी लिलाव सुरू करावा अशी विनंती केली आहे. व्यवसायीक सकारात्मक निर्णय घेतील त्यांनी वेळ मागितला आहे.

कारवाईची टांगती तलवार

कांदा व्यापाऱ्यावरील कारवाई हा पणन विभागाशी संबधित निर्णय असून त्यावर पणन विभाग निर्णय घेईल त्यामुळे बैठकीनंतरही कांदा व्यापाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे

सुट्यांमुळे घोळ

बहिष्कार आज मागे घ्यावा हा पालकमंत्र्यांचा आग्रह होता तर व्यवसायीकांनी दोन दिवसात घेउन असे सांगितले त्यानंतर शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस आहे अशा वेळी सुट्टीच्या दिवशी निर्णय होणे शक्य नसल्याने पालकमंत्री आजच बहिष्कार मागे घ्यावा यासाठी आग्रही होते.

नाफेडची माहिती

नाफेडच्या खरेदीबाबत आज सायंकाळ पर्यंत खरेदीबाबत माहिती मागितली आहे कोणत्या शेतकऱ्यांची आणि कोणत्या दराने खरेदी केली याची माहिती मागीतल्याचे भुसे यांनी सांगितले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT