petrol pump esakal
नाशिक

Petrol Pump Strike : ...अन्‍यथा ३१ ऑक्‍टोबरला पेट्रोलपंप बंद! पेट्रो डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे प्रशासनाला निवेदन

Latest Nashik News : मागणीचा विचार न झाल्‍यास ३१ ऑक्‍टोबरला असोसिएशनने एक दिवसाच्या लाक्षणिक बंदचा इशारा जिल्‍हा प्रशासनाला दिला आहे. याबाबतची माहिती अध्यक्ष विजय ठाकरे यांनी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एक महिन्यापासून अवैधरीत्या सुरू झालेल्या बेकायदेशीर लाइट डिझेल ऑइल (एलडीओ) विक्री केंद्रांची तपासणी करत नियमानुसार कारवाई करण्याची मागणी जिल्‍हा पेट्रो डीलर्स वेल्‍फेअर असोसिएशनने केली आहे. मागणीचा विचार न झाल्‍यास ३१ ऑक्‍टोबरला असोसिएशनने एक दिवसाच्या लाक्षणिक बंदचा इशारा जिल्‍हा प्रशासनाला दिला आहे. याबाबतची माहिती अध्यक्ष विजय ठाकरे यांनी दिली आहे. (petrol pump off on 31st October petro dealers welfare association)

असोसिएशनच्‍या निवेदनात म्‍हटले आहे, की असोसिएशनच्या सभासदांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर एलडीओ विक्री केंद्रांना माहिती घेण्याच्या उद्देशाने भेट दिली. त्या वेळी अनेक अनियमितता आढळून आल्या. बहुतांश केंद्रांनी कृषी जमिनीवर कुठलीही एनए परवानगी न घेता व्यावसायिक विक्री सुरू केली आहे.

कुठल्याही केंद्राकडे खरेदीचे बिल अथवा इनव्हॉइस नाही. तीन ते सहा हजार लिटर प्लॅस्टिकच्या टाक्यांमध्ये इंधन साठविलेले आहे. त्यासाठीची संबंधित विभागाची परवानगी घेतलेली नाही. विक्री करण्याच्या युनिटवर ‘व्‍यावसायिक वापरासाठी नाही’ असे लिहिलेले आहे. वजनमाप विभागाकडून पडताळणी न करताच राजरोस विक्री सुरू आहे. (latest marathi news)

यासह इतर अनेक अनियमितता असल्‍याचा आरोप असोसिएशनने जिल्‍हा प्रशासनाला दिलेल्‍या निवेदनातून केला आहे. विविध विभागांची पथके बनवून तपासणी करावी व ग्राहक, शेतकरी, शासनाचे महसूल विभागाचे नुकसान टाळावे. या घटनांमुळे जिल्ह्यातील पेट्रोलपंपचालकांमध्ये असंतोष आहे.

एक महिन्यापासून अवैध बाबीसाठी दाद मागत आहोत. मात्र कारवाई होण्याऐवजी बेकायदेशीरपणा वाढत असल्‍याचा आरोप केला आहे. नियमानुसार कारवाई न झाल्यास ३१ ऑक्‍टोबरला जिल्ह्यातील सर्व सुमारे साडेचारशे पेट्रोलपंप एक दिवसाचा निषेध म्हणून लाक्षणिक बंद ठेवले जातील, असे स्‍पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

Ahmadpur Crime : अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात पिता पुत्राचा अज्ञात हल्लेखोरांकडून निर्घुन खून

Maharashtra Police : श्रीशैल्य चिवडशेट्टी बारामतीचे नवीन पोलिस निरिक्षक

Eknath Khadse : खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा पर्दाफाश! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग, सोने घेणारा सराफ अटकेत

निशिगंधा वाड यांची लेक अभिनय क्षेत्रात येणार? दीपक देऊळकर म्हणाले, 'माझी मुलगी गोल्ड मेडलिस्ट पण...

SCROLL FOR NEXT