overdue esakal
नाशिक

Nashik News : वेतन अधीक्षकांकडून थकीत बिलांची अडवणूक; नीलेश साळुंखे यांच्यासह शिक्षकांनी केला पर्दाफाश

Nashik : नितीन पाटील यांना सुनावत खरडपट्टी काढलेली असतानाही, त्यांच्याकडून शिक्षकांची बिले अडवाअडवीचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गत महिन्यात शिक्षकांची रखडलेली थकीत बिले मिळत नसल्याने आमदार किशोर दराडे यांनी वेतन अधीक्षक नितीन पाटील यांना सुनावत खरडपट्टी काढलेली असतानाही, त्यांच्याकडून शिक्षकांची बिले अडवाअडवीचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. कार्यालयातून बिले मंजूर करण्याऐवजी ते उद्यानात कोडवर्डद्वारे बिले मंजूर करीत असल्याचा पर्दाफाश नाशिक पॅरेंट्‌स असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश साळुंखे यांनी केला आहे. (Nashik Overdue bills intercepted by Pay Superintendent marathi News )

याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची विविध प्रकारची फरक बिले मंजुरीची प्रक्रिया शिक्षण विभाग व वेतन पथकामार्फत सुरू आहे. सदरची प्रक्रिया अतिशय गोंधळात सुरू असल्याने शिक्षकांना हेलपाटे मारावे लागत असून, शिक्षण विभागाने पाठविलेल्या ‘पीडीएफ’मध्ये शिक्षकांची नावे असूनही सदरची बिले जमा करून घेतली गेली नसल्याच्या तक्रारी होत्या.

या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीत जिल्हा मुख्याध्यापक संघ व सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची नाशिक येथे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, वेतन अधीक्षक नितीन पाटील, माध्यमिकचे अधीक्षक सुधीर पगार यांच्या उपस्थितीत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी बैठक घेतली होती. या वेळी दराडे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर धरले होते. या प्रकारानंतर काहीशी बिले काढण्यात आली. मात्र, आता पुन्हा शिक्षकांच्या बिलांची अडवणूक सुरू आहे. (latest marathi news)

याबाबत सातत्याने तक्रारी करून न्याय मिळत नसल्याने नाशिक पॅरेंट्‌स असोसिएशनचे अध्यक्ष साळुंखे यांनी नितीन पाटील यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळी पाटील हे कार्यालयाऐवजी आवारातील उद्यानात होते. त्या वेळी ते फोनद्वारे अनेकांशी कोडवर्डमध्ये बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर साळुंखे यांसह शिक्षकांनी त्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी तत्काळ कार्यालयात जात बिले काढण्याचे काम केले.

''थकीत बिले लवकरात लवकर अदा केली जावीत, यासाठी वेतन पथक अधीक्षक यांच्याकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत होतो. नितीन पाटील यांनी दुर्लक्ष केल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत शिक्षण उपसंचालकांना अनेकदा फोनद्वारे कळविले. मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्याने शिक्षण आयुक्तांकडे तक्रार केली आहे. पाटील हे कार्यालयात उपस्थित न राहता जवळच्या उद्यानात आढळले. या प्रकरणाचा जाब विचारला असता, पाटील यांनी राजकीय लोकांची नावे घेत दमदाटी केली. मुख्यमंत्र्यांचा फोन आला, तरीही बिले अदा करणार नाही, असा दम दिला. कार्यालयात बिले मंजूर करण्यासाठी टक्केवारी घेतली जात असल्याचा शिक्षकांचा आरोप आहे.''- नीलेश साळुंखे, अध्यक्ष, नाशिक पॅरेंट्‌स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT