Saptashrungi Devi esakal
नाशिक

Navratri 2024 : पंचामृत महापूजेने नवरात्रोत्सवास प्रारंभ! सप्तशृंगी गडावर तयारी पूर्ण; महिला मंडळासह भाविकांनी फुलले रस्ते

Latest Navratri 2024 News : नवरात्रोत्सवातील पहिली माळेस श्री भगवतीच्या दरबारात उपस्थित राहाण्यासाठी गडाकडे येणारे रस्ते महिला मंडळासह भाविकांनी फुलुन गेले आहे.

दिगंबर पाटोळे

वणी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी गडावर गुरुवारी (ता.३) सकाळी ७ ला आदिमायेचे आभूषणांची सवाद्य मिरवणूक व पंचामृत महापूजेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवातील पहिली माळेस श्री भगवतीच्या दरबारात उपस्थित राहाण्यासाठी गडाकडे येणारे रस्ते महिला मंडळासह भाविकांनी फुलुन गेले आहे. (Preparations complete at Saptshringi gad)

सकाळी सहाला सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्यावतीने ब्रम्हवृंदांना वर्दी देवून ट्रस्ट कार्यालयात आदिमायेच्या दागिन्यांचे पूजन होईल. यानंतर डफाच्या निनादात व आई भगवतीच्या जयघोषात दागिन्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. मुख्य जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलाणी हस्ते सपत्नीक देवीची पंचामृत महापूजेस सुरुवात होईल.

तत्पूर्वी मंदीराची प्रक्षालय पुजा व मूळमुर्तीची पाद्य पुजन होईल. यानंतर श्री भगवतीस नवमहावस्त्र नेसवून सुर्वण मुकुट, कमरपट्टा, पावले या अलंकारासह सोन्याचे मंगळसूत्र, मोहनमाळ, नथ, कर्णफुले, कोहिरी हार आदी आभुषनांची विधीवत शृंगार करण्यात येईल. नंतर देवीची महाआरती होवून सकाळी साडेनऊला प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री. जगमलानी यांच्याच हस्ते घटस्थापना होवून नवरात्रोत्सवास प्रारंभ होईल.

नवरात्रोत्सवाचे मुख्य दिवस हे सप्तमी ते महानवमी असे असेल. ११ ऑक्टोबरला रोजी आदिमायेच्या कीर्तीध्वजाचे दुपारी ट्रस्ट कार्यालयात पुजन होवून मिरवणूक निघेल व मध्यरात्री गडाच्या शिखरावर ध्वजाचे मानकरी गवळी पाटील हे ध्वज फटकवतील. १६ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा उत्सवातील आकर्षाचा केंद्रबिंदू असलेला तृतीयपंथीयांची छबिना मिरवणूक, तसेच हजारो कावडीधारकांनी विविध ठिकाणाहून आलेल्या तीर्थांने रात्री ८ ते १२ दरम्यान जलाभिषेक होईल. (latest marathi news)

मोफत महाप्रसाद

भाविकांसाठी ट्रस्टच्या प्रसादालयात सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवालय तलाव परिसरात येणारे पदयात्रेकरु, कावडीधारक भाविकांसाठी निवाऱ्यासाठी दोन वॉटरप्रुप मंडप उभारण्यात आले आहे. ट्रस्ट व ग्रामपंचायततर्फे संपूर्ण गड व मंदीर परिसरात शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

नवरात्रोत्सव व कोजागिरी उत्सवात सुमारे ८ लाख भाविक गडावर हजेरी लावण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्था राखणेकामी अतिरीक्त पोलिस अधिक्षक आदित्य मिलखीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT