Leaking roof in Amardham. esakal
नाशिक

Nashik News : पंचवटी अमरधामच्या छताला गळती; नागरिकांकडून उपाययोजना करण्याची मागणी

Nashik : पंचवटी परिसरात असलेले अमरधामच्या छताला गळती लागली आहे. यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्या काही दिवसांपासून रिमझिम सुरू झाली असून यामुळे पंचवटी परिसरात असलेले अमरधामच्या छताला गळती लागली आहे. यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी अमरधामची गळती तत्काळ रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. स्मार्टसिटीकडे वाटचाल करत असलेल्या नाशिकमध्ये नागरिकांचा शेवटचा मार्ग खडतरच झाला आहे. शहरात स्मार्टसिटी अंतर्गत विविध विकासकामे पूर्णत्वास आलेले आहे. (Nashik Panchavati Amardham roof leak )

यात करोडो रुपये खर्च झाले आहेत. नाशिकमधील दोन महत्त्वाचे अमरधामच शेवटचा घटका मोजताना दिसत आहे. शहरातील अडचणींचा सामना नाशिककर गुपचूप सहन करत आहे. मात्र, गरीब, श्रीमंत आणि मध्यम वर्गीय मानवी जीवनात शेवटचा प्रवास हा अमरधाम येथेच होत असतो हे अंतिम सत्य आहे. मात्र, याच्याशी मनपा प्रशासनाला काही देणेघेणे नसल्याचे दुर्दैवी चित्र पंचवटी परिसरातील अमरधाम येथे गेल्यावर दिसून येते. काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरू केली आहे.

मात्र, नाशिकमधील अमरधाम येथे ज्या नागरिकांनी या दोन दिवसात हजेरी लावली आहे. त्यांना खूपच कडवट अनुभव आला आहे. या अमरधाममधील छतामधून पावसाच्या पाण्याची गळती सुरू झाली आहे. छतातून पाण्याची गळती होत असल्याने या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना आणि नातलगांना उभे राहणे मुश्कील झाले आहे. प्रत्येक बेडजवळ मोठ्या प्रमाणात पाणी गळत असून हे पाणी याच ठिकाणी साचून राहत असल्याने अंत्यसंस्कार करावा कसा, हा प्रश्न नातेवाइकांसमोर उभा ठाकत आहे. (latest marathi news)

त्यात अनेकदा या साचलेल्या पाण्यातून चालताना अनेकांचे पाय घसरून पडण्याच्या घटना घडू लागल्या आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध येत असल्याने त्यांना या साचलेल्या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनपा प्रशासन अधिकारी तथा प्रशासक डॉ. कैलास करंजकर यांनी तत्काळ पंचवटी येथील अमरधाम यासह शहरातील सर्वच अमरधामाची पाहणी करून तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

युवकांची निःस्वार्थ सेवा

अमरधाममध्ये काही युवक आलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांची निःस्वार्थ मदत करीत असतात. हे युवक याठिकाणी साचलेले पाणी झाडून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करीत आहे. मात्र, छताची गळती कायम सुरु राहत असल्याने झाडू तरी किती वेळा मारून पाणी बाहेर काढायचे असा प्रश्न त्यांना देखील पडला आहे. त्यामुळे संपूर्ण अमरधाम इमारतीमध्ये पाण्याचे डबके साचलेले दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT