Dignitaries inaugurating Police Recruitment Training Camp organized by Urja Yuva Pratishthan.  esakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्यातील हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे पोलिस भरती सराव परीक्षा, प्रशिक्षण

Nashik News : ऊर्जा युवा प्रतिष्ठान व अश्वमेध करिअर ॲकॅडमीतर्फे आयोजित पोलिस भरती सराव परीक्षा व प्रशिक्षण शिबिरात नाशिक जिल्ह्यातील सुमारे हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ऊर्जा युवा प्रतिष्ठान व अश्वमेध करिअर ॲकॅडमीतर्फे आयोजित पोलिस भरती सराव परीक्षा व प्रशिक्षण शिबिरात नाशिक जिल्ह्यातील सुमारे हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र सरकारमार्फत या वर्षी मोठ्या प्रमाणात सुमारे १७, ००० पदांची पोलिस भरती होत आहे.

या भरतीत नाशिकमधील जास्तीत- जास्त विद्यार्थी पास होऊन पोलिस भारती व्हावे, यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी जिल्ह्यातील युवकांसाठी पोलिस भरती सराव परीक्षा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. (Nashik Police Recruitment Practice Training by Urja Yuva Pratishthan marathi news)

केटीएचएम कॉलेज येथे आयोजित प्रशिक्षण शिबिराची सुरवात खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते क्रिडा साहित्याचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते, केटीएचएम कॉलेजचे प्राचार्य श्री. दरेकर, अश्वमेध करिअर ॲकॅडमीचे संचालक मनीष बोरस्ते, लोकसभा संघटक योगेश म्हस्के, उपजिल्हाप्रमुख शशिकांत कोठुळे, युवासेना लोकसभा विस्तारक योगेश बेलदार, विधानसभाप्रमुख रोशन शिंदे, उपमहानगरप्रमुख आनंद फरताळे, युवासेना जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुवर्णा मटाले, महानगरप्रमुख अस्मिता देशमाने आदी उपस्थित होते. (Latest Marathi News)

खासदार हेमंत गोडसे यांनी शिबिरात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या भरतीत नक्कीच फायदा होईल व जिल्ह्यातील जास्तीत- जास्त विद्यार्थी भरती होतील यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अजय बोरस्ते यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर राबविलेले सर्वच उपक्रम हे वेगळे असल्याने विद्यार्थ्यांना व नाशिककरांना नेहमी फायदाच झाला असल्याचे सांगितले.

रविवारी (ता.१०) शिबिरात विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यातील कोणकोणते कागदपत्रांची कमतरता आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांची उंची मोजून मुलांसाठी १६०० व मुलींसाठी ८०० मीटर रनिंग व गोळाफेक चाचणी घेण्यात आली. शारीरिक चाचणीत जास्तीत- जास्त गुण कसे मिळवता येईल यासाठी क्रिडा शिक्षकांनी मार्गदर्शन केले. दुपार सत्रात लेखी परीक्षा घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT