Motorists plying the narrow road due to encroachment at the main intersection esakal
नाशिक

Nashik News : पाथर्डी फाटा अतिक्रमणाच्या विळख्यात! ना फेरीवाला क्षेत्रात सर्रास अतिक्रमण

Nashik News : शहरातील पाथर्डी फाटा भागात सिडको, अंबड ,सातपूर इंदिरानगर ,नाशिक रोड देवळाली या भागातील नागरिकांची मोठी ये जा होत असते.

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : परिसरातील पाथर्डी फाटा चौकाला हार, फुले, फळ, विक्रेते, भेळ, भत्ता, चहा आदींच्या टपऱ्यांसह रिक्षा, प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळीपिवळी जीप, व्हॅन, टॅक्सी यांच्या बेशिस्त पार्किंगमुळे अतिक्रमणाने या भागातील मोठा रस्ता अरुंद बनले असून येथून जातांना नागरिकांना आपला जीव मुठीत धरुन जाण्याची वेळ आली आहे.

सदरचा परिसर हा पूर्णतः: ना फेरीवाला झोन असताना देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणाकडे पालिका प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने येथील अतिक्रमण चांगलेच वाढले आहे. (Nashik Pathardi Phata encroachment marathi news)

शहरातील पाथर्डी फाटा भागात सिडको, अंबड ,सातपूर इंदिरानगर ,नाशिक रोड देवळाली या भागातील नागरिकांची मोठी ये जा होत असते. तसेच मुंबईकडून नाशिककडे आणि नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूक देखील या भागातून होत असते. त्यामुळे याठिकाणी सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या प्रचंड गर्दी असते.

या गर्दीवर नियंत्रण मिळावे, चौकात वाहतूक कोंडी होवू नये म्हणून याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यामुळे वाहनचालकांना काहीअंशी शिस्त लागली खरी. मात्र चौकात चहूबाजूने असलेल्या अतिक्रमणामुळे मोठे रस्ते अरुंद झाल्याने आता या भागातून प्रवास करताना सर्वांनाच जीव मुठीत जाण्याची वेळ येत आहे. चौकात सर्व बाजूने मोठे छोट्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.

पार्किंगची समस्या जटिल

पाथर्डी फाटा परिसरात आता मोठ्या आस्थापना तयार झाल्या असून याठिकाणी पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने येथे येणारे लोक आपली वाहने ही रस्त्यावरच लावत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत आहे. देवळाली- पाथर्डी रस्त्यावर रिक्षा थांबे आहेत.

मात्र नेहमी क्षमतेपेक्षा जास्त रिक्षा या ठिकाणी उभ्या राहत असल्याने सायंकाळच्या सुमारास याभागात मोठी वाहतूक कोंडीला सर्वांना सामोरे जावे लागते. मध्यंतरी खासदार हेमंत गोडसे यांच्या विकास निधीतून येथील चौकाचे रुंदीकरण करण्यास सुरवात झाली.

त्यावेळी आत मध्ये लावण्यात येणारी अनधिकृत वाहने तिथून हटविली खरी मात्र ती वाहने आता सर्विस रोडला ओळीने उभी राहतात. त्यामुळे रस्ते अरुंद झाले असून अपघाताची भीती देखील वाढली आहे. (Latest Marathi News)

कारवाई ठरते औटघटकेची

याठिकाणी अतिक्रमण धारकांवर मनपा प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई होते. मात्र अतिक्रमण पथक पुढे जातात परिस्थिती जैसे थे होती. या चौकात पुढे अनधिकृत मच्छी बाजार तसेच भाजी बाजार आहे. त्याविषयी अनेक वेळा माजी नगरसेवकांसह अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र तात्पुरत्या कारवाईनंतर सर्व काही पुन्हा सुरळीत होते. त्यामुळे समस्या मात्र आहे त्याठिकाणी राहिली आहे.

"गेल्या अनेक वर्षांपासून या भागात वास्तव्यास आहे .रस्ते रुंदीकरणाची गरज आहे .मात्र अनधिकृत अतिक्रमणाची मोठी समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करत आहे. त्याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे."- डॉ. पुष्पा पाटील नवले, सामाजिक कार्यकर्ता

"सायंकाळच्या वेळी अतिक्रमणामुळे वाहन चालवणे जिकरीचे होते .रस्त्याचा मोठा भाग अतिक्रमणधारकांनी बळकावला आहे .त्यामुळे उर्वरित रस्त्यातून वाहन चालवण्याची कसरत करावी लागते."- प्रमोद कांदळकर, स्थानिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar Beef Seized: 'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त'; जुन्नर पोलिसांची धडक कारवाई

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT