Accident News sakal
नाशिक

Nashik Accident News: अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार; नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे येथील घटना

Nashik News : शहरात भरधाव वेगात वाहने चालवून पादचाऱ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न केला जात असून पोलिसांकडून मात्र अशा बेदरकार वाहनचालकांविरोधात कारवाई होत नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : नाशिक - पुणे महामार्गावरील पळसे येथे भरधाव वेगातील अज्ञाक वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शहरात भरधाव वेगात वाहने चालवून पादचाऱ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न केला जात असून पोलिसांकडून मात्र अशा बेदरकार वाहनचालकांविरोधात कारवाई होत नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Pedestrian killed in collision with unknown vehicle at Palase)

विनोद प्रसाद रघुनाथप्रसाद जैन (मुळ रा. हरियाणा. हल्ली रा. चौधरी बिल्डरर्स, पळसे, ता.जि. नाशिक) असे ठार झालेल्या पादचारी परप्रांतीयाचे नाव आहे. जैन रविवारी (ता. २१) सकाळी दहाच्या सुमारास पळसे येथील विसावा हॉटेल भागात गायींना नैवेद्य दाखविण्यासाठी गेले होते. नैवेद्य दाखवून ते घराकडे परतत असतांना पुण्याकडून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या अज्ञात चारचाकी कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले होते. सविता गवळी यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केले. अपघातानंतर चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अजित शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : लोकलने स्टेशन चुकवलं, प्लॅटफॉर्म सोडून २ किमी पुढे थांबली; गाडीतल्या प्रवाशांना रुळावर उतरण्याची वेळ, चूक कुणाची?

MPSC Exam : सोलापूरचा विजय लामकाने प्रथम; महिला प्रवर्गातून आरती जाधव प्रथम

Chhatrapati Sambhajinagar: व्यापाऱ्याचे दोन किलो सोने लंपास; गुजरातच्या तिघांविरोधात गुन्हा, सव्वातीन कोटींची फसवणूक

Silver Trader Death : सांगलीतील 24 वर्षीय चांदी व्यावसायिकाचा कोल्हापुरात संशयास्पद मृत्यू; चांदीच्या पार्सलमध्ये आढळलं तांबं, घटनेने मोठी खळबळ

Supreme Court: न्यायाधीशाला ‘विकण्याचा’ प्रयत्न, ३० लाखांच्या लाच प्रकरणात ७० वर्षीय वकिलाला सुप्रीम कोर्टाचा जबरदस्त धक्का!

SCROLL FOR NEXT