नाशिक

महिन्याकाठी ९ हजार रुपयांची पेन्शन द्यावी

CD
पान-३ NSK26H34541 नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी नाशिक जिल्हा ईपीएफ ९५ पेन्शनर्स फाउंडेशनतर्फे विविध मागण्यांसाठी काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले, त्यात सहभागी झालेले पेन्शनधारक. ----------------- महिन्याकाठी ९ हजार रुपये पेन्शन द्यावी ईपीएस-९५ पेन्शनधारकांची मागणी; जिल्हाधिकारीसमोर निदर्शने सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता ५ : महिन्याकाठी किमान नऊ हजार रुपये पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता लागू करावा. मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी ईपीएस-९५ पेन्शनधारकांनी गुुरुवारी (ता. ५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत केंद्र सरकारच्या पेन्शन धोरणांचा निषेध नोंदविला. त्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ईपीएस-९५ पेन्शनधारकांनी दिलेल्या निवेदनात आयुष्यभर विविध उद्योग आणि संस्थांमध्ये काम करून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या कामगारांना सेवानिवृत्तीनंतर अत्यल्प पेन्शनवर गुजराण करावी लागते. अनेक पेन्शनधारकांना दरमहा केवळ एक ते दोन हजार रुपये पेन्शन मिळते. वाढती महागाई, औषधोपचार आणि दैनंदिन खर्च पाहता या रकमेत सन्मानाने जीवन जगणे कठीण होत आहे. त्यामुळे किमान ९ हजार रुपये पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता लागू करावा. ऑगस्ट २०१४ मधील ई-६०९ ठरावाद्वारे केलेले अन्यायकारक बदल रद्द करावे. अधिक पेन्शनसाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना लाभ देतानाच पेन्शनची फेरगणना करून थकबाकी अदा करावी आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनाप्रसंगी राजू देसले, शिवाजी ढोबळे, नामदेवराव बोराडे, उत्तमराव आढाव, डी. बी. जोशी, रमेश खापरे, सुभाष शेळके, भाऊसाहेब शिंदे, साहेबराव शिवले, शिवराम रसाळ यांच्यासह पेन्शनधारक उपस्थित होते. ----- एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न ऐरणीवर एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन अर्जांचा प्रश्नही आंदोलनात उपस्थित करण्यात आला. एसटीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन अर्ज पीएफ कार्यालयाकडून स्वीकारले जात नसल्याने संबंधित कर्मचारी दीड वर्षांपासून अडचणीत आहेत. हा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात इशारा देण्यात आला. ------------

मालक अचानक घरी आला, १९ वर्षीय लेकीला कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, पुढे जे घडलं ते...; थरकाप उडवणारी घटना

IND vs NZ 2nd ODI : भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा सामना केव्हा? किती वाजता सुरू होणार अन् Live कुठे पाहता येणार

Mahua Moitra: 'सीजेपीला विदेशातून नव्हे, तर भाजपकडूनच फंडींग!' भाजपच्या आरोपांवर महुआ मोइत्रांचा 'गुगली'?

Latest Marathi News Live Update : "स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही"; माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा स्पष्ट कायदेशीर सल्ला

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याला नवे नेतृत्व! राजवर्धन शिंदे तिसऱ्यांदा अध्यक्षपदी; संग्राम सोरटे उपाध्यक्ष

SCROLL FOR NEXT