Navsu Lohar esakal
नाशिक

Nashik Crime News : गुजरातचा सराईत लाकूड तस्कर नरसू जेरबंद!

Nashik News : पेठ तालुक्यातील जंगलातील मौल्यवान साग व खैर झाडांची चोरटी तोड करून तस्करी प्रकरणातील गुजरात राज्यातील सराईत नवसू लोहार यास अलगद अखेर वनविभागाला सापडला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पेठ तालुक्यातील जंगलातील मौल्यवान साग व खैर झाडांची चोरटी तोड करून तस्करी प्रकरणातील गुजरात राज्यातील सराईत नवसू लोहार यास अलगद अखेर वनविभागाला सापडला. वनविभागाने त्याला पाच दिवसाची वन कोठडी देण्यात आली आहे. पेठच्या जंगलातील गेली सहा ते सात वर्षांपासून नाकावर टिच्चून साग. (Gujarat wood smuggler Narsu lohar jailed)

खैर प्रजातींची कत्तल करून रातोरात जंगल साफ करीत असल्याच्या संशयावरुन वन विभागाकडून अनेक दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता. यापूर्वी वन विभागाच्या अनेक धाडीत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत फरार होणारा हा संशयित नाशिकला पोलिस सुनावणी संदर्भात आल्याची माहिती मिळाल्यावरून त्याच्या मागावर असलेल्या वनविभागाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

संशयित नवसूच्या अटकेने तालुक्यातील अनेक जंगलाच्या लाकूड चोऱ्या उघडकीस येण्याची वन विभागाला आशा आहे. त्याच्या चौकशीत पेठ भागातील जंगल साफ करण्यात त्याला मदत करणाऱ्या अनेक त्याच्या साथीदारांची नावे पुढे येणार आहे. वनविभागाचे पथके त्यांच्या शोधात कार्यरत असून संशयितांची झडती सुरू झाली आहे.

गुजरातचा सराईत

संशयित नरसू हा गुजरात राज्यातील सराईत लाकूड तस्कर असून पेठ तालुक्यातील वनसंपदेची लयलूट करत असल्याच्या संशयावरून वन विभाग त्याच्या मागावर होते. तसेच येथील अनेक लाकूड चोरीत त्याचे नाव येत होते मात्र तो वनविभागाच्या तावडीतून निसटून जात असे. (latest marathi news)

न्यायालयाने त्यास अधिक तपासासाठी पाच दिवसाची वन कोठडी दिली असून यात तालुक्यातील त्याच्या साथीदारांसह इतरही कोणकोण मदत करते याचा वन विभागाकडून तपास सुरु आहे. निष्पन्न होवुन तालुक्यातील वनसंपदेच्या होणाऱ्या तस्करीला काही प्रमाणात आळा बसेल अशी आशा आहे.

सिमावर्ती कारवाया

महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सिमावर्ती भागातील जंगलात लाकडांची तस्करी करणाऱ्या सराईतांची मोडस ऑपरेडी आहे.महाराष्ट्रातून कारवाया होउ लागताच शेजारील गुजरात राज्यात हे पळून जातात. गुजरात प्रशासनाकडून कारवाया सुरु होताच महाराष्ट्राच्या जंगलात लपायचे. दोन्ही यंत्रणा एकाचवेळी कारवाया करीत नसल्याने तस्करांचा फावतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Violence: कट्टर भक्तांचा कहर... RJD ची स्तुती केली म्हणून NDA समर्थक मामांनी भाचाला संपवलं, कुठं घडली घटना?

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

Kelva Beach: वीकेंडला निसर्गाचा आनंद घ्यायचा? मग डहाणू ट्रेनने निघा आणि थेट ‘केळवा बीच’वर पोहोचा

Maharashtra Politics:'सुशीलकुमार शिंदेंच्या गुगलींवर शरद पवारांचा गुड लेफ्ट'; बॅटिंग टाळली, जुन्या आठवणींना उजाळा..

माेठी बातमी! 'बिबट्याच्या हल्ल्यातील नुकसान भरपाई वाढणार'; शासनस्तरावर हालचाली सुरु, राज्यभरात हल्ल्यांत वाढ..

SCROLL FOR NEXT