The old barn here befits a peth village station. After demolishing it, the work is starting again. esakal
नाशिक

Peth MSRTC Depot: जुन्या-नव्याच्या वादात भरडले जाताहेत प्रवासी! पेठला समस्याच समस्या, स्वच्छतागृह वापराविना, कामही रखडलेलेच

Latest Nashik News : गळक्या बस, तुटलेल्या काचा, रिमोल्ड केलेले टायर आणि गावांपर्यंत शंभर टक्के सुखरूप प्रवासाची शाश्वती नसणे यामुळे प्रवासी खासगी प्रवासाला प्राधान्य देत आहेत.

रखमाजी सुपारे

Peth MSRTC Depot : पेठ आगारातील असुविधांअभावी प्रवाशांसह शालेय विद्यार्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आगार व्यवस्थापकांच्या चुकीच्या नियोजनामुळे प्रवाशांना दररोज नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गळक्या बस, तुटलेल्या काचा, रिमोल्ड केलेले टायर आणि गावांपर्यंत शंभर टक्के सुखरूप प्रवासाची शाश्वती नसणे यामुळे प्रवासी खासगी प्रवासाला प्राधान्य देत आहेत. एसटी आगाराचे अधिकारी ही बाब कधी लक्षात घेणार हा प्रश्‍न आहे. (Peth MSRTC Depot Passengers in trouble)

महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यातील दळणवळणाच्या केंद्रस्थानी असलेले पेठ शहर, मात्र शहरातील बस आगार परिसरात पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. उन्हाळ्यात धुळीने नागरिक त्रस्त होतात. प्रवाशांसह व्यावसायिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.

चिखलामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे तसेच गळक्या बसमुळे शेकडो विद्यार्थी व सरकारी, खासगी कामासाठी प्रवास करण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. एक प्रकारे येथील खासगी वाहतुकीला चालनाच देत आहेत. यामुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे.

काम कधी बंद तर कधी सुरू

पेठ येथे नवीन बसस्थानकाच्या बांधकामासाठी निधी प्राप्त झाल्याने जुने बसस्थानक पाडून पावसाळ्याच्या तोंडावर नवीन बसस्थानकाचे बांधकाम सुरू करण्यात आले. खूप वर्षानंतर या बसस्थानकाला झळाळी मिळणार असल्याने समाधानही आहे, मात्र बसस्थानकाचे काम कधी सुरु तर कधी बंद असते. अजूनही पिलरही उभे राहिलेले नाहीत. कामाची मुदत मात्र डिसेंबर २०२५ अखेर असल्याने बसस्थानकाचे फक्त अर्धवट पिलर उभे असून खोदलेल्या खड्डयांना पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले आहे.

प्रवाशांसाठी तात्पुरते पत्र्याचे शेड

बसस्थानक आवारात एका बाजूला तात्पुरते पत्र्याचे शेड उभारून बस व प्रवाशांसाठी तर व्यावसायिकांनीही तात्पुरते शेड तयार करून त्यात आपले व्यवसाय थाटले आहेत. उन्हाळा येईपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते, पावसात या तात्पुरत्या शेडमध्ये पाणी शिरले, आणि सर्वत्र चिखल झाला. नवीन बांधकामही सद्या बंद असल्याने प्रवाशांना ‘ना घरका ना घाटका’ असे झाले आहे. साचलेले पाणी अन गवतामुळे डासांचा प्रार्दुभाव वाढल्याने अनेकांना सर्दी, खोकला, तापाने पछाडलेले आहे. (latest marathi news)

स्वच्छतागृहे पाण्याविना...

पेठ येथून नाशिक, नगर, पुणे, जळगाव, शिर्डी यासह गुजरात राज्यात बस सोडल्या जातात. पेठ व हरसूल भागातून मोठया प्रमाणावर विद्यार्थी शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी पेठ येथे येतात. बसस्थानकात असलेल्या स्वच्छतागृहाची स्वच्छेतेअभावी दुर्दशा झाली असून पाण्याची टाकी असूनही ती पाण्याअभावी नेहमी कोरडीच असते. त्यामुळे विद्यार्थिनींसह प्रवाशांची कुंचबणा होते. केवळ नियोजनाअभावी प्रवाशांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे .

"नविन बसस्थानकासाठी पायाचे खोदकाम झाले, मात्र तेथील खड्यामंध्ये साचलेल्या पाण्याला दुर्गंधी येत असून बसस्थानक आवारात डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. बसस्थानक आवारातील स्वच्छतागृह कधी पाण्याअभावी तर कधी अस्वच्छेतेअभावी महिलावर्ग वापरत नाही. प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे निवारा शेड उभारले होते. असुविधांमुळे महिला प्रवासी तिथे थांबत नाही."

- सरिता भोये, महाविद्यालयीन विद्यार्थिनी.

"आम्हाला खेड्यावरून तालुक्याच्या ठिकाणी सरकारी कामासाठी बसने प्रवास सोयीचा असतो. गळक्या बसमुळे अनेकदा बसमध्येच छत्री उघडून प्रवास केला. जुने टायर असल्याने पंक्चर होण्याचे प्रमाण जास्त असल्याने गावापर्यंत जाण्यासाठी देवाला आळवणी घालावी लागते. कधी पंक्चर झाल्याच्या ठिकाणापासून पायपीटही करावी लागते."- किसन गावित, प्रवासी घनशेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT