नाशिक

विल्होळी परिसरातील औषध कंनीच्या गोडाऊनला आग लागून लाखांचे नुकसान

CD
मेन फोटो : A14933, A14932 नाशिक : औषध कंपनीच्या गोडाऊनला लागलेली आग. दुसऱ्या छायाचित्रात जेसीबीच्या साह्याने गोडाऊनचा तोडण्यात आलेला पत्रा --- विल्होळीतील औषध कंपनीच्या गोडाऊनला आग अग्निशमन पथकाकडून तासाभरात आगीवर नियंत्रण; लाखांचे नुकसान सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, नवीन नाशिक, ता. ३ : विल्होळी येथील अरमान वेलनेस औषध कंपनीच्या गोडाऊनला अचानक आग लागण्याची घटना शनिवारी (ता. ३) सकाळी घडली. गोडाऊनमधील कच्चामाल, पुट्टे आणि भंगार साहित्यासह काही इलेक्ट्रिकल साहित्य जळून लाखांचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या पथकाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा कंपनीही आगीच्या कचाट्यात सापडून मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. अग्निशमन मुख्यालयास शनिवारी सकाळी घटनेची माहिती मिळाली. अग्निशमन मुख्यालय आणि सिडको केंद्राचे असे दोन बंब अवघ्या काही वेळेत घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बंबांच्या साह्याने आगीवर पाण्याचा मारा करत सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तत्पूर्वी जेसीबीच्या साह्याने गोडाऊनचा पत्रा तोडून रस्ता तयार करण्यात आल्याने अग्निशमन पथकास आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. आगीचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नाही. अवघ्या काही वेळेतच संपूर्ण गोडाऊन आगीच्या कचाट्यात सापडल्याने आतील कच्चामाल, पॅकिंगचे पुठ्ठे आणि भंगार साहित्यांसह इलेक्ट्रिक साहित्य जळून लाखांचे नुकसान झाले. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने जळालेला मलबा हटविल्याने पूर्णपणे आग विझवण्यास मदत झाली. मुख्यालयातील अग्निशमन अधिकारी किशोर पाटील, सिडको केंद्रप्रमुख अर्शद पटेल, लीडिंग फायरमन नितीन म्हस्के, उदय शिर्के, फायरमन गणेश गायधनी, नाजीम देशमुख, एम. पी. अहिरे, पार्थ शिंदे, संकेत पगारे, शुभम शेवाळे, प्रसाद खैरनार आदींच्या प्रयत्नाने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीवर नियंत्रण मिळताच सर्वांनी सुटकेचा विश्वास सोडला. ---चौकट फायर यंत्रणेचा अभाव अग्निशमन अधिकारी किशोर पाटील यांनी पाहणी केली असता कंपनीत कुठल्याही प्रकारची आग प्रतिबंधक यंत्रणा आढळून आली नाही. कंपनी सुरू करताना अग्निशमन विभागाची परवानगी घेत फायर यंत्रणा उभारणे आवश्यक असते. भविष्यात पुन्हा अशी दुर्घटना घडू नये. यासाठी श्री. पाटील यांनी संबंधितांना खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या. ---कोट कंपनीत कुठल्याही प्रकारची फायर यंत्रणा कार्यान्वित नव्हती. तसेच अग्निशमन विभागाची परवानगी आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात येईल. - किशोर पाटील, अग्निशमन पथकप्रमुख

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

दुष्काळी दौऱ्याच्या गर्दीवर डोळा; लुटीचा डाव भोकरदन पोलिसांनी २४ तासांत उधळला!

SCROLL FOR NEXT