planning of water supply in village collapsed esakal
नाशिक

Nashik News : ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे गावातील पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले

Latest Marathi News : एक महिन्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वीज पुरवठा खंडित होत असल्याने नाराजीचा सुर वीज ग्राहकांकडून उमटत आहे.

दीपक खैरनार

अंबासन, (जि.नाशिक) : येथे गेल्या एक महिन्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वीज पुरवठा खंडित होत असल्याने नाराजीचा सुर वीज ग्राहकांकडून उमटत आहे. सद्या वीजचोरी रोखण्यासाठी गावात बंच केबलचे काम संबधित ठेकेदाराकडून मनमानी कारभाराने अतिशय धिम्या गतीने सुरू असून चार ते पाच मजूर काम करीत आहेत. संबधित ठेकेदाराने मजूरांची संख्या वाढवून गावातील वीजप्रवाह सुरळीत करावा यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून वीज वितरण कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. (planning of water supply in village collapsed due to delay of contractor in ambasan )

अंबासन फिडरवरील वीजचोरीला आळा बसावा उपाययोजना म्हणून वीज वितरण कंपनीकडून फिडरवरील सारदे, अंबासन व काकडगाव गावात बंच केबल बसविण्याचे काम सद्या सुरू आहे. दरम्यान अंबासन फिडरवर गेल्या एक महिन्यापासून वीजेचा लपंडाव सुरू असल्याने कोणते ना कोणते कारण पुढे केले जात आहे. वळवाडे शिवारातून जाणारी सोलर वीजवाहक तार टाकतांनाही वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातो तसेच गावात सद्या एका ठेकेदारामार्फत बंच केबल टाकण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून कासव गतीने सुरू आहे.

यामुळे गावातील पाणीपुरवठा योजनेवर परिणाम झाला असून पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. संबधित ठेकेदाराला मजूरवर्ग वाढवून काम लवकर करावे व वीजप्रवाह सुरळीत करावा यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तंबी दिल्यानंतरही मजुर वाढवत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून वीज वितरण कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. मात्र पत्रव्यवहार करूनही संबधित ठेकेदाराकडून मजूरवर्गची संख्येत वाढ नसल्याने पत्राला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. (latest marathi news)

गावातील पिठाच्या गिरण्या, पाणी पुरवठा नियोजन, विद्यार्थ्यांचा अभ्यास व व्यावसायिकांचे गणित कोलमडून पडले आहे. वीज महावितरण कंपनीने लक्ष घालून अंबासन फिडरवरील वारंवार होणारा खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा तसेच संबधित ठेकेदाराने मजुरांची संख्या वाढवून अंधारातून सुटका करावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनासह वीज ग्राहकांकडून केली जात आहे.

''बंच केबलच्या कामावर मजुरांची संख्या वाढविण्याबाबत संबधित ठेकेदाराला ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले होते. मात्र मजुर वाढवत नसल्याने याचा परिणाम गावातील पाणीपुरवठय़ावर होत आहे. याबाबत वीज वितरण कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे.''-शशीकांत कोर, ग्रामपंचायत सदस्य अंबासन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

SCROLL FOR NEXT