Only 25 percent sowing in Kharif done in district  esakal
नाशिक

Nashik News : निफाड तालुक्यात पेरण्या खोळंबल्या! खरिपात 25 टक्केच पेरणी; बाजारपेठेत शुकशुकाट

Nashik News : निफाड तालुक्यात सरासरी १०० मिलीमीटर पावसाची नोंद असली तरी तो सर्वदुर न बरसल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत.

एस. डी. आहिरे : सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : पावसाने गेल्या आठ-दहा दिवसांपासून निफाड तालुक्यात हुलकावणी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. निफाड तालुक्यात सरासरी १०० मिलीमीटर पावसाची नोंद असली तरी तो सर्वदुर न बरसल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. अद्याप ७५ टक्के पेरण्या पुरेशा पावसाअभावी होऊ शकल्या नाहीत. (Planting in Niphad taluka was disrupted Only 25 percent sowing in Kharif)

पेरण्या संकटात सापडल्याने पिंपळगाव बसवंतसह निफाड तालुक्यातील कृषीनिविष्ठा केंद्रांवरील उलाढाल थंडावली असून, बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. पंधरा दिवसांपूर्वी निफाड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. शेतीशिवारात पेरणीची लगबग सुरू झाली होती. पण, गेल्या दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. आकाशात ढग दाटून येतात. पण, पाऊस दडी मारून बसला आहे.

परिणामी, पेरण्या थांबल्या आहेत. रानवड, ओझर, सायखेडा, निफाड, लासलगाव आदी महसूल मंडळात पावसाची तुट कायम असल्याने जलस्त्रोताची पातळी वाढलेली नाही. चांगल्या पावसाच्या अपेक्षने आतापर्यंत २५ टक्के पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. पावसाने आखडता हात घेतल्याने पेरणी वाया जाण्याची भीती असून, दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

यंदा पावसाळा सुरू होऊन २३ दिवस उलटले आहेत. तरीही निफाड तालुक्यात अद्याप ७५ टक्के पीकपेरणी बाकी आहे. तालुक्यात यंदा ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिप हंगामाची पेरणी अपेक्षित आहे. २८ जूनपर्यंत आठ हजार ४०२ हेक्टरवर पीकपेरणी झाली आहे. खरिपात मका व सोयाबीनचे प्रमुख पीक आहे. त्यात सोयाबीनची १८ हजार ७०० हेक्टरपैकी चार हजार ४०२ तर मक्याची १२ हजार ५०० पैकी चार हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. (latest marathi news)

एकूण पेरणी ८ हजार ४०२ हेक्टरपर्यंत झाली आहे. पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतरच रखडलेल्या खरिप पेरण्यांना गती येणार आहे. त्यामुळे दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. यावर्षी वेळवर व भरपूर पाऊस पडेल, या आशेने बहुतेक शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, अनेक भागात पाऊस नसल्याने कोवळी पिके धोक्यात आली आहेत.

पेरणी होऊन उगवण होत असलेल्या पिकाला आता पाण्याची आवश्‍यकता आहे. निफाड तालुक्यात खरिपातील नगदी पिक असलेल्या टोमॅटोची लागवड जोरात सुरू आहे. मल्चिंग पेपरचा वापर करून लागवड सुरू आहे. यंदा तीन हजार हेक्टरवर निफाड तालुक्यात टोमॅटोची लागवड शक्य आहे.

"शेतकऱ्यांनी बियाणे नेले. पेरणीयोग्य पाऊस अद्याप झालेला नाही. पेरण्या रखडल्याने फवारणीचे औषध घेण्यासाठीही शेतकरी येईना. दरवर्षी जून अखेरीला औषध खरेदीला गर्दी असते. पावसाअभावी उलाढाल मंदावली आहे." - ऋषिकेश मोरे, श्रीपाद ॲग्रो, पिंपळगाव बसवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

Mohol News : अठरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT