Kalaram Mandir esakal
नाशिक

Nashik Ram Navami 2024 : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क! पोलीस आयुक्तांकडून कडेकोट बंदोबस्ताच्या सूचना

Nashik News : श्री प्रभुरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहराला यामुळे विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Ram Navami 2024 : येत्या बुधवारी (ता. १७) श्री रामनवमी आहे. यानिमित्ताने शहरातील प्राचीन श्री काळाराम मंदिरासह शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे, विविध संघटनांकडूनही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आढावा घेत कडेकोट पोलीस बंदोबस्ताच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, गुन्हेशाखेच्या विशेष शाखेकडून नियोजन केले जात आहे. (Nashik Police alert in wake of Ram Navami 2024 marathi news)

श्री प्रभुरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहराला यामुळे विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे शहरात श्री रामनवमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. येत्या बुधवारी (ता. १७) रामनवमी असल्याने पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरासह शहरातील विविध मंदिरांमध्ये रामनवमी निमित्ताने जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तर काही सामाजिक संघटनांच्या वतीनेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. (latest marathi news)

लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना अशावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. यात रामनवमी (ता. १७) व रामरथयात्रा (ता. १९) यासंदर्भात आढावा घेत त्या दृष्टीकोनातून कडेकोट पोलीस बंदोबस्ताच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार, शहर गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखा बंदोबस्ताचे नियोजन करीत आहे. त्याचप्रमाणे, वाहतूक शाखेतर्फेही शहरातील काही मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT