Ambad Police Station esakal
नाशिक

Nashik Police : सिडको, इंदिरा नगर भागातील अवैध सावकार पोलिसांच्या रडारवर!

Nashik News : अव्वाच्या सव्वा पटीने सावकारी वसुली तसेच नागरिकांची छळवणूक करणाऱ्या सावकारांविरोधात आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिडको : अवैध सावकारी जाचाला कंटाळून गेल्या वर्षभरात आठ ते दहा कर्जदारांनी आत्महत्या केल्या आहेत. तर या अवैध सावकारांकडून कर्जदारांना धमकी तसेच कुटुंबीयांची छळवणूक जबरदस्तीने प्रॉपर्टीवर कब्जा करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यामुळे दिवसेंदिवस कर्जदारांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

अव्वाच्या सव्वा पटीने सावकारी वसुली तसेच नागरिकांची छळवणूक करणाऱ्या सावकारांविरोधात आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. अंबड, इंदिरा नगर पोलिसांकडून आता परिसरातील सावकारांची यादी मागविणार असल्याचे समजते आहे. (Nashik CIDCO illegal lenders in on police radar news)

संपूर्ण नाशिक शहरात सध्या अवैध सावकारांचा गैरव्यवहार दिवसेंदिवस वाढत आहे. प्रति महिना ५ टक्क्यांपासून २० टक्के दराने अवैध सावकार कर्जदारांना कर्ज देतात. या बदल्यात काही सावकार तर चक्क वस्तू, घरे, सोने गाड्याही गहाण ठेवतात. परिणामी कर्जदारांना व्याज तसेच मुद्दल देण्यास विलंब झाल्यास या अवैध सावकारांकडून थेट दाम दुप्पट पैसे आकारले जातात.

दोन ते तीन महिने दिल्यास गहाण ठेवलेल्या वस्तूंचा सावकारांकडून लिलाव केला जातो. सावकारांच्या या जाचाला कंटाळून सिडको, सातपूर इंदिरा नगर परिसरात गेल्या वर्षभरात आठ ते दहा आत्महत्या झाल्या आहेत. या अवैध सावकारीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना दिसून येत आहेत.

दोन धंदे करणारे गुंड, तसेच राजकीय नेत्यांचे काही पंटर लोक हा अवैध सावकारीचा काळा धंदा सर्रासपणे चालवत आहेत. दिवसेंदिवस ही अवैध सावकारी फोफावत असल्याने यापुढे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयाकडूनही कोणतीही कारवाई होत नाही.

यामुळे अव्वाच्या सव्वा पटीने वसुली करून कुटुंबीयांना कोणी धमकावत असेल तर अशा सावकारांविरोधात नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी, अशा सावकारांवर लगेचच कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यामुळे आता अवैध सावकार पोलिसांच्या रडारवर आल्याने अवैध सावकारांचे धाबे दणाणणार आहेत.

"अवैध पद्धतीने कोणी सावकारी धंदा करून नागरिकांना धमक्या तसेच छळवणूक करीत असल्यास अशा सावकारांविरोधात नागरिकांनी थेट पोलिसांना तक्रार करावी, अशा अवैध सावकारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल." - शेखर देशमुख, सहायक पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिंदेंच्या आमदाराचा फुकटचा राडा, कँटिन नाहक बदनाम; अन्न आणि औषध प्रशासनाकडून क्लीन चीट

Nandwal Dance Party Clash : करवीर तालुक्यात पार्टीदरम्यान नृत्यांगना नाचवल्याने गावात खळबळ; तरुणांमध्ये वादावादी, पोलिसांचा हस्तक्षेप

Diwali Recharge Offer : दिवाळी स्पेशल 1 रुपयचा रिचार्ज! रोज 2GB डेटा, कॉलिंग, SMS अन् महिन्याची वैधता, बड्या कंपनीने आणली धमाका ऑफर

Pune News : पुण्यात मुख्यमंत्री, संरक्षणमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी साप; उपस्थितांचा उडाला गोंधळ

संकर्षण कऱ्हाडेंनी घेतली नितिन गडकरी यांची भेट, भेटीदरम्यान मिळाली खास भेट, अभिनेता म्हणाला...

SCROLL FOR NEXT