Nashik Police Combing Nashik Road Ambad Satpur Police Combing Action against 50 defectors esakal
नाशिक

Nashik Police Combing: नाशिकरोड, अंबड, सातपूरला पोलिसांचे कोबिंग! 50 टवाळखोरांविरोधात कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Combing : शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन अंतर्गत गुन्हेगारीविरोधात कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

कोबिंगदरम्यान रेकॉर्डवरील ६५ गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली तर, ५० टवाळखोरांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. (Nashik Police Combing Nashik Road Ambad Satpur Police Combing Action against 50 defectors)

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोनमध्ये पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारांविरोधात अचानक कोंबिंग ऑपरेशन राबविले.

नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, अंबड आणि सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरूवारी (ता.९) पहाटेपर्यंत कोंबिंग आॅपरेशन सुरू होते.

यावेळी पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील १३५ गुन्हेगारांची तपासणी केली असता, ६५ गुन्हेगारांची चौकशी करून त्यांची आवश्यक ती माहिती घेऊन कारवाई करण्यात आली.

तसेच, यावेळी पोलिसांनी ५० टवाळखोरी करणार्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, अंबड आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८ जणांविरोधात कोटपा अन्वये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात सराईत गुन्हेगार, तडीपार गुंड गावठी कट्टे व धारदार हत्यारे बाळगून वावरताना आढळून येत आहेत. त्यामुळे आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशाने गुन्हेगारांविरोधात अचानक कोंबिंग, ऑलआऊटची कारवाई करीत आयुक्तालय हद्दीमध्ये नाकाबंदी करण्यात येत आहे.

सातपूर व अंबड एमआयडीसीमध्ये फिक्सपॉईंट बंदोबस्त व गस्ती वाढविण्यात आली आहे. सदरील कोंम्बिंगमध्ये उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, आनंदा वाघ यांच्यासह पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : 'लाडक्या बहिणींना' नागपूर महानगर पालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT