Tawalkhor brought during combing operation at Ambad police station. esakal
नाशिक

Police Combing Operation : पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चेकिंग

Nashik News : रात्री हाणामारी, टवाळखोरी, लूटमार आणि मद्यपान करून रॅश ड्रायव्हिंगचे प्रकार वाढल्याने आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनमध्ये गुन्हेगारांविरुद्ध कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रात्री हाणामारी, टवाळखोरी, लूटमार आणि मद्यपान करून रॅश ड्रायव्हिंगचे प्रकार वाढल्याने आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनमध्ये गुन्हेगारांविरुद्ध कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. धडक मोहिमेत पोलिसांनी १५६ सराईत गुन्हेगारांची चेकिंग केली. तसेच, ७७ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. (police combing operation Checking of criminals on record)

शहरात काही दिवसांपासून सातत्याने हाणामारीच्या घटनांसह गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये परिमंडळ दोनमध्ये पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. नाशिक रोडसह उपनगर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, अंबड आणि सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे ऑपरेशन राबविण्यात आले.

या वेळी परिमंडळ दोनमधील रेकॉर्डवरील १५६ गुन्हेगारांची चेकिंग करण्यात आली. यात शंभर गुन्हेगारांची चौकशी करून त्यांच्याकडून चौकशी फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच, नाशिक रोड, देवळाली कॅम्प हद्दीतील तडीपार करण्यात आलेल्यांचीही चेकिंग करण्यात आली. (latest marathi news)

सातपूर हद्दीत मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या चौघांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर, पाथर्डी गावात खुलाल चांडे यास देशी दारूच्या बाटल्यासह ताब्यात घेण्यात आले. तसेच, १३ जणांविरुद्ध कोटपान्वये कारवाई करून अडीच हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

तसेच, ७७ टवाळखोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. तर अशा स्वरूपाची कारवाई सातत्याने करण्याची अपेक्षा जागरूक नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT