Nashik Police Commissioner Ankush Shinde transferred Sandeep Karnik new Commissioner of Police esakal
नाशिक

Nashik Breaking: संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त! अंकुश शिंदे यांची तडकाफडकी बदली

तडकाफडकी बदली करण्यात आाल्याचे आश्चर्य व्यक्त होते आहे...

सकाळ वृत्तसेवा

Nashik Breaking : नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाली आहे. पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक हे नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

शिंदे यांची गेल्या डिसेंबर २०२२ मध्ये नाशिक पोलीस आयुक्ताचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या तडकाफडकी बदली करण्यात आाल्याचे आश्चर्य व्यक्त होते आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयातील सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आलेली आहे. कर्णिक हे इलेक्ट्रिकल इंजीनियर पदवी प्राप्त केली.

त्यानंतर 2004 च्या बॅचचे आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) अधिकारी आहेत. त्यांनी अहमदनगर, ठाणे, नागपुर, जालना, नांदेड यासह पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.

मुंबईत त्यांनी अप्पर आयुक्त म्हणून कर्तव्य बजाविले आहे. सध्या ते पुणे आयुक्तालयात सहआयुक्त म्हणून काम पाहत होते. आता ते नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील.

दरम्यान, आयुक्त शिंदे यांची राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. गेल्या १६ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला होता.

त्यांच्या ११ महिन्यातील कार्यकाळात शहरातील गुंडागर्दी रोखण्यासाठी मोक्काअंतर्गत कारवाई करीत गुंडांमध्ये दहशत निर्माण केली होती. तसेच, पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्येही कामचुकारपणाबद्दल तात्काळ कारवाई केल्याने पोलीस दलातही वचक निर्माण केला हाेता.

पिंपरी चिंचवडचे आयुक्त असतानाही त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आताही नाशिकचा दोन वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली गृहविभागाने केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: आधार कार्ड, फोटो घेतला; नळ कनेक्शनचा पत्ता नाही ; मॉडेल मिल चाळीतील नागरिकांचा संताप ; वर्षानुवर्षे रहिवासी टँकरवर अवलंबून

डब्बा पार्टीला गेले, तलावात पोहायला जाणं बेतलं जीवावर; बहीण-भावासह चौघांचा मृत्यू, चौघे १२ ते २१ वयाचे

Yedshi Sanctuary: येडशी अभयारण्यातील वाघ चार महिन्यांपासून बेपत्ताच; व्याघ्र गणनेसह बुद्ध पौर्णिमेच्या निसर्गफेरीतही झाले नाही दर्शन, वनविभागासमोर प्रश्‍न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर

Mahavitaran Clerk Killed Case : सांगली हादरली! महावितरणच्या लिपिकाचा गोळ्या झाडून निर्घृण खून, संखमध्ये मध्यरात्री थरार

SCROLL FOR NEXT