Nashik Police Commissioner Jayant Naiknavare conference
Nashik Police Commissioner Jayant Naiknavare conference esakal
नाशिक

नियमाप्रमाणे चला, अन्यथा तुमची Travel Bus जप्त : पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : औरंगाबाद रोडवर घडलेल्या दुर्दैवी घटनेची पुन्हा होऊ नये, यासाठी ट्रॅव्हल चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. जादा प्रवासी बसमध्ये न बसविता बस वाढवा. कायद्याच्या कक्षेत राहून आपला व्यवसाय करा. नियमाप्रमाणे चला, अन्यथा तुमची ट्रॅव्हल बस जप्त करील, असा सज्जड दमच यांनी शहरातील ट्रॅव्हल्स चालकांना दिला. (Nashik Police Commissioner Jayant Naiknavare warning to Private travel bus companies nashik Latest Marathi News)

पोलिस आयुक्तालयातील मुख्यालयाच्या आवारातील भीष्मराज बाम सभागृहात शहरातील ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह ट्रॅव्हल्स चालकांची बैठक बुधवारी (ता. १२) झाली. शनिवारी (ता. ८) औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर झालेल्या ट्रॅव्हल बस व ट्रक अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर सदर बैठक पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

या वेळी परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे, परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय खरात, वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, महापालिकेचे शहर अभियंता वंजारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. आयुक्त नाईकनवरे म्हणाले, ट्रॅव्हल चालकांनी आपल्या बस मार्गस्थ होताना त्यात परमिटप्रमाणेच प्रवासी बसवावे. जादा प्रवासी जरी ड्रायव्हर बसवतो आणि त्याची तुम्हाला माहिती नसते, असा आपण दावा करीत असला तरी तो तितकासा खरा नाही.

जादा प्रवाशांच्या हव्यासातून बसचालकाला जादा पैसे मिळत असतील तर, त्यापेक्षा ट्रॅव्हल्स चालकांनी ड्रायव्हरला चांगले वेतन द्यावे. बसला ट्रॅकर लावा, बसमध्ये सीसीटीव्ही बसवा. त्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये माहिती मिळू शकेल. जादा प्रवासी भरण्याऐवजी बस वाढवा. दिवाळीचा काळ असल्याने प्रवासी वाढतील, या काळात पोलिस काटेकोरपणे तपासणी करतील. त्यात जादा प्रवासी, वाहतूक नियमांचे उल्लंघन, ओव्हर स्पीड आढळून आल्यास अशा ट्रॅव्हल्स बस जप्त केल्या जातील.

त्यानंतर त्या कशा सोडवायच्या, त्या तुमचे तुम्ही पाहून घ्या, असा सूचक इशाराच बैठकीला उपस्थित ट्रॅव्हल्स चालकांना दिला. या वेळी ट्रॅव्हल चालकांनीही समस्या उपस्थित करताना, आगामी काळ दिवाळीचा असल्याने या दरम्यान ट्रॅव्हल्सला जादा प्रवासी बसविण्याची सवलत देण्याची विनंती करण्यात आली. त्यावर पोलिसांनी नकार दिल्यानंतर महामंडळाच्या बसमध्येही जादा प्रवासी बसविण्यात येतात, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी ट्रॅव्हल्स चालकांनी केली. तर, योगेश दुसाने यांनी ट्रॅव्हलसाठी स्वतंत्र पार्किंग नाही.

महापालिकेकडे याबाबत आजपर्यंत शेकडो निवेदने देण्यात आली, मात्र अद्यापही त्यावर तोडगा निघत नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स रस्त्यालगत पार्क कराव्या लागतात. त्यावरूनही कारवाईचा बडगा उगारला जातो. पार्किंगची समस्या सोडवावी, अशी मागणी केली. तर, अश्‍पाक खान यांनी, औरंगाबाद रोडवरील अपघात झालेल्या चौफुलीवर स्पीडब्रेकर असते तर अपघात टाळता आला असता. अजूनही काही चौकांमध्ये स्पीडब्रेकर नाहीत. ते उभारण्यात यावेत, अशी मागणी केली. या बैठकीला दिलीपसिंग बेनीवाल, श्रीकांत मंत्री, किशोर लोखंडे, राहुल पाईक, कैलास ताटे, राजाराम चौधरी, तनदीप सिंग आदींसह ट्रॅव्हल्स चालक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT