nashik colice commissioner participated in the funeral procession of the police constable Sakal
नाशिक

नाशिक : पोलिस शिपायाच्या अंत्ययात्रेत आयुक्तांनी दिला खांदा

विनोद बेदरकर


नाशिक : आडगाव परिसरातील पोलिस शिपायाच्या निधनानंतर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी मृत शिपायाच्या अंत्ययात्रेला खांदा दिला. या प्रसंगी शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शहरातील पोलिसप्रमुखांची माणुसकी अनुभवली. गुरुवारी (ता. १६) आडगाव भागातील प्रतीक विलास जाधव (वय ३१) या तरुण शिपायाचे निधन झाले.

शहरातील दंगल नियंत्रण पथकात कार्यरत असलेल्या प्रतीक जाधव यांच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करीत त्यांना लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर अंत्ययात्रेत मृत जाधव यांचे नातेवाईक सागर वाल्मीक जाधव यांच्यासह स्वतः पोलिस आयुक्तांनी भाग घेत खांदाही दिला. कमी वयात निधन झाल्याने पोलिसांत हळहळ व्यक्त होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Political History: परराष्ट्र सचिवांना हटविणे ही चूक होती; राजीव गांधींची सोनियांकडे कबुली

Amul Milk Price Hike : अमुल, मदर डेअरीचे दूध महागले; प्रतिलिटर ४ रुपयांपर्यंत वाढ, ग्राहकांना बसणार फटका

‘मला ही भूमिका करायचीच नव्हती’; 'रामायणम्'मध्ये काम करण्यास अभिनेत्याने दिलेला नकार, सांगितलं खरं कारण

Latest Marathi News Live Update : नव्या कसारा घाटात भीषण अपघातात एकाचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Swachh Survekshan 2025-26 : देशातील सर्वात स्वच्छ ठरले महाराष्ट्रातील 'हे' शहर; ४,७५१ शहरांना मागे टाकत पटकावला पहिला क्रमांक

SCROLL FOR NEXT