md student doctor death case Google
नाशिक

प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मृत्यूची सखोल चौकशी करणार : पोलिस आयुक्त

विनोद बेदरकर

नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी केली जाणार असून, शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समजणार असल्याचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणप्रकरणी गुरुवारी (ता.१९) पंचवटीतील इच्छामणी पेट्रोल पंपावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पांडे म्हणाले की, प्रशिक्षणार्थी डॉक्टर स्वप्नील शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आवश्यक व्यक्तींचे जाबजबाब व पंचनामा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मयत शिंदे यांचे वडीलही भेटले असून, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्या मनातील संशय व त्यांची तक्रार नोंदविण्यात आली आहे. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या मृत्यूप्रकरणी पोलिस प्रशासन सखोल चौकशी करणार असून, प्रकरणातील सत्य बाहेर काढले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय मयत डॉक्टर शिंदे यांच्यासोबत त्यांची आई राहत असल्याने त्यांच्या आईचे स्टेटमेंटही महत्वाचे ठरणार आहे. सध्या मुलाच्या जाण्याने त्या दुःखात असल्याने तूर्तास त्यांच्याशी या विषयावर बोलणे संयुक्तिक ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT