पान तीन ॲंकर
------------------
33862
नाशिक : पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना सन्मानित करताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा. समवेत पालकमंत्री गिरीश महाजन, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे.
अमली पदार्थ विरोधात शहर पोलिसांची धडक कारवाई
तीन वर्षांत २ कोटी १५ लाखांचे ड्रग्स जप्त : १७४ तस्करांना बेड्या
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २९ : शहर पोलिस आयुक्तालय क्षेत्रात अमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांनी तीव्र मोहीम राबवली आहे. नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २ कोटी १५ लाख ८७ हजार ५६६ रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत एकूण ७९ गुन्हे दाखल करून तब्बल १७४ जणांना अटक केली आहे. दरम्यान, अमली पदार्थविरोधातील कारवाईची दखल घेत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना गौरविण्यात आले.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी शहरात तस्करांविरोधात धडक कारवाई करीतएम.डी. (मेफेड्रोन) च्या ४१ केसेसमध्ये १ किलो ९५२ ग्रॅम ७२ मिलिग्राम वजनाचे एमडी बाजारमूल्य असलेले सुमारे १ कोटी १ लाख ३१ हजार २९५ रुपये किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले असून १११ संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
तर, गांजाच्या ३० गुन्ह्यांमध्ये ३३२ किलो ८८ ग्रॅम वजनाचा, ४९ लाख ६९ हजार ९२६ रुपये किमतीचा गांजा जप्त करून ४८ जणांवर कारवाई केली आहे. भांगेच्या ४ गुन्ह्यांमध्ये २८० किलो ६४५ ग्रॅम वजनाची, २ लाख ८८ हजार ८९० रुपये किमतीची भांग जप्त करण्यात आली असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे. डोडा (पॉपी स्ट्रॉ) च्या २ प्रकरणात १३३ किलो ३५७ ग्रॅम वजनाचा, २८ लाख ३७ हजार ९५५ रुपये किमतीचा माल जप्त करून ३ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
याशिवाय, ४८७ ग्रॅम ॲफेटामाईन सुमारे २४ लाख ३५ हजारांचा आणि ४९ ग्रॅम चरस सुमारे २४ हजार ९०० रुपयांचा असा अमली पदार्थ हस्तगत करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
---------
धुळ्यातही गुन्ह्याची नोंद
तपासादरम्यान एका कारवाईत संशयिताकडे ८२ किलो २८४ ग्रॅम वजनाचा, एकूण १९ लाख ५४ हजार ४६० रुपये किमतीचा डोडा (पॉपी स्ट्रॉ) हा अमली पदार्थ मिळून आला. या प्रकरणी धुळे जिल्ह्यातील साक्री पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...
(फोटो वापरावा)
तरुणाईला विळखा घालणाऱ्या अमली पदार्थ तस्करांविरोधात शहर पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. या दरम्यान अनेक नेटवर्क उदध्वस्त करण्यात आले आहे. ड्रग्स माफियांविरोधातील कारवाई यापुढेही कठोर स्वरुपात सुरू राहणार आहे.
- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.