Nashik Police Commissionerate esakal
नाशिक

Nashik Police Helpline: उशिराने रिस्पॉन्स देणाऱ्यांची कानउघाडणी; आयुक्तालयाकडून दररोज आढावा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पोलीस आयुक्तालय हद्दीतील वादावादीच्या ठिकाणी तात्काळ पोलीस पोहोचावी यासाठी ‘डायल ११२’ ही हेल्पलाईन सुरू केली असून, यावर संपर्क साधताच संबंधित हद्दीतील पोलीसांची रिस्पॉन्स टीम तात्काळ पोहोचणे अपेक्षित आहे.

परंतु काही पथके घटनेच्या ठिकाणी वेळेपेक्षाही विलंबाने पोहोचत असल्याने अशा पथकाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावून त्यांची कानउघाडणी केली जात आहे. (Nashik Police Helpline Apologies to Late Responders Daily review by police Commissionerate news)

डायल ११२ यावर संपर्क साधला असता, घटनास्थळी पोहोचण्यासाठी नाशिक आयुक्तालयातील सरासरी रिस्पॉन्स टाईम सहा ते साडेसहा मिनिटे आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाशी डायल ११२ ही हेल्पलाईन कार्यान्वित आहे. आयुक्तालय हददीत गुन्हेगारी स्वरुपाची घटना घडल्यास त्याबाबत तात्काळ डायल ११२ वरून माहिती नियंत्रण कक्षाला मिळते.

ही यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीतील १३ पोलीस ठाण्यांमध्ये बिटनिहाय अधिकारी-कर्मचारी व वाहने पुरविण्यात आलेली आहेत.

नियंत्रण कक्षाकडे दिवसाला सरासरी दीडशे कॉल्स येतात. कॉल्स प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळापासून नजिक असलेल्या संबंधित पोलीस ठाण्याच्या पथकाला माहिती दिली जाते. पथकांची वाहने जीपीएसद्वारे नियंत्रण कक्षाशी जोडले गेलेले आहेत.

घटनेची माहिती मिळताच संबंधित डायल ११२ पथक वा बीटमार्शलने सदरच्या ठिकाणी कमीत कमी वेळेत पोहोचून प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. असे असले तरी काही पथक बीटमार्शल विलंबाने पोहोचतात.

घटनास्थळी ठराविक वेळेपेक्षाही अधिक विलंबाने काही पथके पोहोचल्याचे आयुक्तालयाच्या निदर्शनास आलेले आहे. अशा पथकांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्तालयाने नोटीसा बजावून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

रिस्पॉन्स महत्त्वाचा

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे स्वत: डायल ११२ हेल्पलाईनकडे लक्ष देत दररोज आढावा घेत आहेत. कॉल प्राप्त झाल्यानंतर सरासरी सहा ते साडेसहा मिनिटांचा कालावधी लागतो, तो आणखी कमी करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.

त्यामुळे सरासरी वेळेपेक्षाही विलंबाने पोहोचण्याऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याचा जाब विचारला जात आहे. समाधानकारक उत्तर नसेल तर त्यांना लेखी ताकीदही दिली जात असल्याने डायल ११२चे अधिकारी- कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Bus Ticket : चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास महागला! कोल्हापूर ते मुंबई तिकीट दर पोहोचला 2700 रुपयांवर...; खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल

Asian Games : महाराष्ट्राच्या लेकांनी वेधला रौप्यपदकाचा अचूक नेम; महिलांपाठोपाठ भारताच्या पुरुष नेमबाजी संघाचाही डंका

विलासराव देशमुखांसमोर जिनिलियाने केलं असं काही, रितेशलाच बसला धक्का; म्हणाला, “मी दचकलो…”

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये गणरायाचे विसर्जन करताना Engineering च्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Thane News: ठाण्यात दणदणाट! विसर्जन मिरवणुकांचा आवाज १०५ डेसिबलवर, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT