फोटो : H34855
नाशिक : वृत्तपत्र विक्रेते प्रतिनिधींसमवेत सहायक आयुक्त संदीप मिटके.
वृत्तपत्र विक्रेत्यांचा
पोलिस प्रशासनाकडून गौरव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सेवेची आणि सामाजिक योगदानाची दखल घेत पोलिस प्रशासनाने त्यांच्याप्रति आदराची भावना व्यक्त केली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून आयुक्त कार्यालयात सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या हस्ते शहर आणि परिसरातील प्रमुख वृत्तपत्र विक्रेता संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करून दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिस प्रशासनाकडून अशा प्रकारे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सर्व विक्रेत्यांमध्ये आपुलकीचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वेळी नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना, नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था, वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था (नवीन नाशिक) आणि सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटना या चारही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी वृत्तपत्र विक्रीच्या दैनंदिन व्यवस्थापनाची सखोल माहिती जाणून घेतली. स्नेहमिलनास शहर वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सिडको वृत्तपत्र सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय ठाकरे, नाशिक रोड वृत्तपत्र सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर यांच्यासह राहुल दुशिंग, ज्ञानेश्वर धात्रक, सचिन शेटे, विजय सोनार, जय भालेराव, संजय शेलार, किरण कर्जतकर व अतुल शिरोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.