Police in career Twice promotion proposal promoted police sakal
नाशिक

नाशिक : पोलिसांना कारकिर्दीत दोनदा पदोन्नतीचा प्रस्ताव

महासंचालक पांडे : पदोन्नती मिळालेल्या पोलिसांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पोलिस नाईक पद रद्द करून, दहा वर्षे सेवा झालेल्यास पोलिस अंमलदारपदी, तर पोलिस अंमलदारांना पोलिस हवालदार, तसेच २० वर्षे सेवा बजावलेल्या अंमलदारांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीसह सहाय्यक पोलिस निरीक्षकपद रद्द करून पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी येथे ही माहिती दिली.

शनिवारी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना श्री. पांडे यांच्या हस्ते पदोन्नती मिळालेल्या पोलिस अधिकाऱ्यांचे फीत लावून कौतुक करण्यात आले. यात, पाच सहाय्यक पोलिस निरीक्षक ते पोलिस निरीक्षक, १५ पोलिस हवालदार ते सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि २३ पोलिस नाईक ते पोलिस हवालदार, तर २४ पोलिस अंमलदार ते पोलिस नाईक अशा पदोन्नती मिळालेल्या पोलिसांचा सत्कार करण्यात आला. पोलिस आयुक्त दीपक पांडे, विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर व्यासपीठावर होते.

दहा कुटुंबांना भेटी

श्री. पांडे म्हणाले की, दर महिन्याला दहा पोलिस कुटुंबीयांना भेटी देऊन त्यांच्या समस्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निराकरण करावे. पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी रोज आर्धा तास इंटरनेटचा वापर करून टेक्नोसॅव्ही होण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पोलिस कर्मचारी वसाहतीत भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी पोलिसांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य उंचाविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पदोन्नती मिळालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जाईल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT