Police Transfers esakal
नाशिक

Nashik Police Transfer: बदलीविरोधात पोलिस निरीक्षकांची ‘मॅट’मध्ये धाव! कार्यकाळ पूर्ण नसताना बदली केल्याचे कारण

Police Transfer : या आदेशाविरोधात पोलीस निरीक्षकांनी मॅटमध्ये धाव घेतली असून, त्यावर येत्या आठवडाभरात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातील अकार्यकारी पदावरील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आल्या आहेत. या आदेशाविरोधात पोलीस निरीक्षकांनी मॅटमध्ये धाव घेतली असून, त्यावर येत्या आठवडाभरात सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Nashik Police Transfer marathi news)

पोलीस महासंचालकाच्या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलिस दलातील १२९ पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षक आणि २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील १० निरीक्षक, १२ सहायक निरीक्षक, १९ उपनिरीक्षकांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहेत.

या बदल्यांच्या आदेशाविरोधात शहर आयुक्तालयातील सात-आठ पोलीस निरीक्षकांनी मॅटमध्ये धाव घेतली आहे. यातील बहुतांशी अधिकारी हे स्थानिक शहर-जिल्हा असल्याने त्यांची बदली केली आहे. तर, काहींना तीन वर्षांचा कार्यकाळ झालेला असल्याने त्यांच्या बदल्या केल्या आहेत.

मात्र, या पोलीस निरीक्षकांच्या महिन्याभरापूर्वी बदल्या करताना अकार्यकारी पदावर नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. असे असतानाही पोलीस महासंचालक कार्यालयाकडून बदल्या केल्याने काही पोलीस निरीक्षकांनी मॅटमध्ये दाद मागितली आहे. यासंदर्भात येत्या आठवडाभरात सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

तिकडे मिळाली स्थगिती

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षकांच्या याच पाशर्वभूमीवर बदल्या करण्यात आल्या असता, त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण नसताना बदल्या केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांना मॅटने स्थगिती दिली आहे. याच निकालाच्या आधारे नाशिकच्या पोलीस निरीक्षकांनीही मॅटमध्ये धाव घेतली असून, त्यांनाही स्थगिती मिळण्याची अपेक्षा आहे.

यांच्या झाल्यात बदल्या

नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेचे नितीन पगार, बाबासाहेब दुकळे, गणेश न्याहदे, विशेष पथकाचे पंकज भालेराव, गुन्हे शाखा एकचे निरीक्षक अनिल शिंदे, अभियोग कक्षाचे राजू पाचोरकर, गुन्हे दोनचे विजय पगारे, श्रीकांत निंबाळकर या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT