Nashik Civil Hospital Shooting esakal
नाशिक

Nashik Civil Hospital: 'अहो, बॉसने मला नाही ओळखले...मी कालू आहे' गर्दुल्याने केली सिव्हिलमध्ये मोबाईल शुटिंग!

Nashik News : जिल्हा रुग्णालयात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षकांनी एकाला पोलिस चौकीतील अंमलदारांकडे आणले अन...

सकाळ वृत्तसेवा

Nashik Civil Hospital : जिल्हा शासकीय रुग्णालयात मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग करणाऱ्या गर्दूल्याच्या करामतीने पोलीस चौकीतील अंमलदार चांगलेच चक्रावले. (Nashik police shocked by drunk man shooting videos civil hospital)

जिल्हा रुग्णालयात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षकांनी एकाला पोलिस चौकीतील अंमलदारांकडे आणले. तो, महिलांच्या वार्डमध्ये त्याच्या मोबाईलमध्ये शुटिंग करीत असल्याने त्यांनी सांगितले. चौकीतील अंमलदारांनी त्याच्याकडील मोबाईल ताब्यात घेत त्यातील व्हिडिओ तपासले असता, त्यात महिला वॉर्डमध्ये जेवण वाढताना झालेल्या गर्दीचा व्हिडिओ चित्रण झालेले होते.

परंतु त्याने ते शुटिंग केलेच कशाला याचा जाब विचारला असता तो समाधानकारक उत्तर न देता ठगेकरी करू लागल्याने पोलिसांनी त्याच्या दोन-तीन कानशिलात लगावल्या. त्याला ‘व्हिडिओ का केला’ याची विचारणा केली. पोलिसांनी चांगलाच दणका दिल्यावर ‘माझा भाचा ॲडमिट आहे. त्याला शोधत होतो. सहज व्हिडिओ केला. (latest marathi news)

मी गुन्हेगार नाही. व्हिडिओमध्ये काही आक्षेपार्ह नाही’, अशी सराईत उत्तरेही तो देत होता. त्याच्या भाच्याचा क्रमांकही पोलिसांना दिला. पोलिसांनी फोन लावून विचारणा केली असता, त्याने आयुक्तालयातील शहर गुन्हे शाखेच्या एका उपनिरीक्षकाचा मोबाईल क्रमांक असल्याचे उघड झाले.

(हाही तपासाचा भाग आहे) त्यावरुनही पोलिसांनी त्याला चांगलेच टोले लगावले. तेव्हा ‘अहो, बॉसनी मला ओळखलं नसेल... मी कालू आहे’, असेच त्याचे दावे सुरु राहिले. पोलिसांनी त्याला चांगलाच चोप देत व्हिडिओ डिलिट करुन समज देत हाकलून दिले. अर्धातास या गोंधळामुळे पोलिसांसह सिव्हिलचे सुरक्षारक्षक मात्र चांगलेच चक्रावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT