नाशिक

पोलिसांचा चोख बंदोबस्त, व्यावसायिकांमधे नाराजी

CD
पोलिसांचा चोख बंदोबस्त, व्यावसायिक नाराज सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.३१ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या त्र्यंबकेश्‍वरमध्ये वाहनाने येण्याचे निश्‍चित झाल्यानंतर पोलिस यंत्रणेवरील ताण अधिक वाढल्याने त्यांनी अतिरिक्त फौजफाटा कामाला लावला. नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील प्रत्येक गावात, चौकात आणि मुख्य ठिकाणी दिवसभर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्र्यंबकेश्‍वर शहरातही चौफेर पोलिस बंदोबस्त तैनात राहिल्यामुळे स्थानिक रहिवासी यांची चांगलीच कोंडी झाली. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या दौऱ्यामुळे शनिवारी नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर रस्त्यालगतचे हॉटेल्स, दुकाने बंद ठेवले. तर त्र्यंबकेश्‍वरमध्ये मुख्यरस्त्यांवरील व्यावसायिकांना दुकाने, हॉटेल्स दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश होते. राष्ट्रपतींचा ताफा जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा सफेद पडदे लावून सुरु असलेल्या कामावर ‘पडदा’ टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथे सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नव्हता. पासधारकांनाच फक्त प्रवेश मिळाला. सायंकाळी राष्ट्रपतींचा ताफा नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले. त्र्यंबकवासियांनी सायंकाळी सुटकेचा निःश्वास टाकला. ... राष्ट्रपतींचा बालकांशी संवाद नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर मार्गाने राष्ट्रपतींचा ताफा नाशिककडे जात असताना पिंपळगाव बहुला येथे रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या बालकांशी द्रौपदी मुर्मु यांनी संवाद साधत त्यांना चॉकलेट भेट दिले. तसेच त्यांच्या शिक्षणाबद्दल विचारपूस केली. …. पुरीभाजी, गुलाबजाम नवीन घाटांवरील ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत साधु-महंतांना भोजन देण्यात आले. पुरी, वांग्याची भाजी, पनीर, वरण भात आणि गोड पदार्थांमध्ये गुलाबजाम व रबडीचा समावेश होता. भोजनगृहाकडे जाताना साधूंना पोलिसांनी प्रतिबंध केल्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Mega Recruitment : तरुणांसाठी मोठी लॉटरी! महसूल विभागात हजारो पदांवर होणार थेट भरती; पाहा दरमहा किती मिळणार मानधन?

Rohit Sharma 45 story: हिटमॅनच्या जर्सीवर '४५' नंबर कसा आला? आधी द्रविडचा अडथळा अन् मग आईचा सल्ला आला कामी

Teacher Recruitment : मुलाखतीसह शिक्षक भरतीच्या १० हजार ३२८ जागांवर ११ हजार ४९३ उमेदवारांची शिफारस

Know Your Army Exhibition : शस्त्रास्त्रांसह युद्धकौशल्याचे दर्शन; मुंबईकरांना अनुभवता आले लष्करी सामर्थ्य!

Positive Story: इतिहास घडला! जेल भोगत असलेल्या आईच्या लेकराला नर्सरीत प्रवेश; कारागृहाच्या दारात येणार स्कूल बस

SCROLL FOR NEXT