Commissionerate Police Action  esakal
नाशिक

Nashik Police : शहरात टवाळखोर, पानटपऱ्यांवर धडक कारवाई; आयुक्तालय हद्दीमध्ये पोलिसांची विशेष मोहीम

Nashik News : पोलिसांच्या या कारवाईमुळे टवाळखोरांसह प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अवैध धंद्यापाठोपाठ रात्रीच्या वेळी विशेष मोहीम राबवून टवाळखोर, पानटपऱ्या व कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे टवाळखोरांसह प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Nashik Special police operation in commissionerate area marathi news)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आयुक्तालय हद्दीमध्ये पोलीस ठाणेनिहाय सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यत धडक विशेष मोहीम राबविली. यात पोलिसांनी २४४ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच, शहरातील २८४ पानटपऱ्यांची कसून तपासणी करीत, कोटपाअंतर्गत १०५ कारवाई करण्यात आल्या.

तसेच शहरात कर्णकर्कश हॉर्न वाजवून सुसाटपणे दुचाक्या चालविणाऱ्या १५ चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांअंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विशेष पथके, गुन्हेशाखांची पथकेही सहभागी झाले होते. (latest marathi news)

अशी केली कारवाई

पोलीस ठाणे.... टवाळखोर....पानटपरी तपासणी...कोटपा...सायलेन्सर

- आडगाव....२६...२५...०९...०२

- पंचवटी .... १४....२३....०८....००

- म्हसरुळ .... २५....००...००....०५

- सरकारवाडा... २३....३०....०५...०२

- भद्रकाली ....२८...२१...०२...०२

- मुंबई नाका.... २२...१९...०५...०१

- गंगापूर.... २०....२५....०५....०२

- सातपूर .....००....२२...२२..००

- अंबड ..... १२....३१....०८...००

- इंदिरानगर.... २१...०८....०५....००

- उपनगर .... १५...२७...१३...००

- नाशिकरोड ....०९....१८....०३...००

- देवळाली कॅम्प .... २८....१८...०९...०१

- चुंचाळे चौकी....००...२७...११...००

एकूण ....२४४....२८४....१०५....१५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT