Field test of the candidates appearing for the recruitment esakal
नाशिक

Nashik Police Recruitment : पावसाच्या विनाव्यत्ययात मैदानी चाचणी! ग्रामीणमध्ये 475, शहरात 281 पात्र

Nashik News : शहर आयुक्तालयाच्या मैदानी चाचणीत २८१ तर ग्रामीणच्या चाचणीत ४७५ उमेदवार पात्र ठरले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Recruitment : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांना पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावली होती, परंतु दुसऱ्या दिवशी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शहर-ग्रामीण दलाच्या मैदानांवर उमेदवारांची चाचणी पार पडल्या. शहर आयुक्तालयाच्या मैदानी चाचणीत २८१ तर ग्रामीणच्या चाचणीत ४७५ उमेदवार पात्र ठरले आहेत. (Nashik Police Recruitment Field test without interruption of rain)

मीनाताई ठाकरे स्टेडिअम येथे सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी प्रक्रियेची पाहणी करताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक.

शहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअम येथे घेतली जात आहे. भरतीच्या दुसऱ्या दिवशी ५०१ उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. त्यापैकी १८५ उमेदवार मैदानी चाचणीला गैरहजर राहिले. ३१६ उमेदवारांची उंची व छातीची मोजमाप केली असता, ३५ उमेदवार अपात्र ठरले. २८१ उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. तर, एका उमेदवाराला शारीरिक व मैदानी चाचणीसाठी सवलत देण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलाची मैदानी चाचणी आडगाव येथील मुख्यालयाच्या मैदानावर घेतली जात आहे. भरतीच्या दुसऱ्या दिवशी ९०६ उमेदवारांना पाचारण करण्यात आले असता, ३७३ जणांनी पाठ दाखविली. ५३३ आणि आदल्या दिवसातील चौघे असे ५३७ उमेदवारांची छाती व उंचीची मोजमाफ घेतली असता, ६१ उमेदवार अपात्र ठरले तर एकाने माघार घेतली. पात्र ठरलेल्या ४७५ उमेदवारांनी मैदानाची चाचणी दिली. यानंतर उमेदवारांना त्यांना मिळालेल्या गुणांचा तपशिल देण्यात आला. ग्रामीण मुख्यालयाच्या वस्तीगृहात उमेदवारांच्या निवासासह नाश्ता, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. (latest marathi news)

आयुक्तांची मैदानावर हजेरी

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुरुवारी (ता. २०) सकाळी पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअम येथे सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीप्रसंगी हजेरी लावली. यावेळी भरतीच्या कामकाजाचे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी यांची उपस्थिती होती. यावेळी आयुक्तांनी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी असलेल्या सोयीसुविधांचीही माहिती घेत पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT